IPL 2025 : निवृत्त खेळाडूंसाठीच्या ‘या’ नियमात बदल करण्याचा आयपीएलचा विचार

IPL 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप्ड धरण्याचा आयपीएलचा विचार आहे 

133
IPL 2025 : निवृत्त खेळाडूंसाठीच्या ‘या’ नियमात बदल करण्याचा आयपीएलचा विचार
IPL 2025 : निवृत्त खेळाडूंसाठीच्या ‘या’ नियमात बदल करण्याचा आयपीएलचा विचार
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये (IPL 2025) एक महत्त्वपूर्ण बदल आगामी काळात घडू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना किमान पाच वर्षांसाठी ‘अनकॅप्ड’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंच्या बरोबरीने धरावं, असा आयपीएल प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे अशा खेळाडूंची मूळ किंमत एकदम कमी होईल. आणि हे संघ मालकांच्या पथ्यावर पडेल. अगदी २०२५ पासून नियमांत हा बदल होऊ शकतो.

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : मनु भाकरची २५ मीटर अंतिम फेरी;  दीपिका कुमारी, भजन कौर यांना अखेरची संधी  )

काही दिवसांपूर्वी मुंबईत फ्रँचाईजी मालकांची एक बैठक झाली. तेव्हा या नियमावर चांगलीच चर्चा रंगल्याचं समजतंय. आणि संघ मालकही या नियमाच्या अंमलबजावणीवर विभागलेले आहेत. सनरायझर्स हैद्राबाद संघाची एक मालक काव्या मारन यांनी पत्रकारांशी बोलताना उघडपणे या प्रस्तावित नियमाला विरोध केला आहे. ‘असा नियम आला तर जुन्या जाणत्या खेळाडूंसाठी ते अपमानास्पद असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांची कारकीर्दही अजून सुरू झाली नाही, अशा खेळाडूंची बरोबरी तुम्ही ज्येष्ठ खेळाडूंशी करत आहात, जे योग्य नाही,’ असं मारन यांनी सांगितलं. (IPL 2025)

उलट काही संघ मालकांना हा नियम योग्यही वाटतो. त्यामुळे ज्या ज्येष्ठ खेळाडूंनी गेला काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही. अशांना इथं चांगली संधी मिळेल, असं या मालकांना वाटतं. तर आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमिन यांना या नियमामुळे अशा खेळाडूंचा फायदाच होईल असं वाटतंय. ‘अनेकदा ज्येष्ठ खेळाडूंची मूळ किंमत जास्त असल्यामुळे कुणी त्यांच्यासाठी पैसे मोजत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे खेळाडूंची किंमतच कमी झाली, तर हा प्रश्न उरणार नाही,’ असं अमिन म्हणाले. (IPL 2025)

(हेही वाचा- Nitin Gadkari : रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, काय आहे पायलट प्रोजेक्ट?)

चेन्नई सुपरकिंग्जचा ज्येष्ठ खेळाडू महेंद्रसिंग धोणीचं उदाहरण या नियमासाठी दिलं जातं. महेंद्रसिंग धोणीने २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं आहे. पण, तो आयपीएल अजूनही खेळतोय. चेन्नई संघाला तो हवा आहे. पण, तो कमी पैशात मिळावा यासाठी संघ मालकांची ही रणनीती असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीचाही या नियमाला पाठिंबा आहे. आयपीएल कार्यकारिणी आता यावर अंतिम निर्णय घेईल. (IPL 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.