-
ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ४० वातानुकूलन यंत्रांची सोय केली आहे. पॅरिसमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. त्यामुळे खेळाडूंना उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने या यंत्र खरेदीला परवानगी दिली आहे. फ्रान्समधील भारतीय दूतावासाशी बोलून यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच दिले होते. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Ind vs SL, 1st ODI : मोठा फटका मारून तो हीरो व्हायला गेला, बाद झाल्यावर झाला ट्रोल)
फ्रान्सचं ऑलिम्पिक व्हिलेज हे अभियांत्रिकी चमत्कार असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. इथल्या घरांची रचना आणि त्यासाठी वापरलेलं साहित्य यामुळे घरांच्या आतील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा ६ अंश सेल्सिअसने कमी राहील, असा दावा आयोजकांनी केला होता. पण, प्रत्यक्षात इथं खेळाडूंना उकाड्याशी सामना करावा लागत आहे. (Paris Olympic 2024)
‘पॅरिस शहरातील उकाडा आणि आर्द्रता याचा खेळाडूंना त्रास होतोय. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन क्रीडा मंत्रालयाने ४० वातानुकृलन यंत्र खेळाडूंच्या खोल्यांमध्ये बसवण्याचे आदेश दिले आहेत,’ असं ऑलिम्पिक असोसिएशनच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Nitin Gadkari : रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, काय आहे पायलट प्रोजेक्ट?)
खासकरून नेमबाजीच्या स्पर्धांमध्येही खेळाडूंना उकाड्याचा त्रास होत असल्याचं जाणवलं. या प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या स्वप्निल कुसाळेलाही अंतिम फेरीत अक्षरश; घाम फुटला होता. तर अनेक स्पर्धकांनी सतत घाम येत असल्याची तक्रार केली होती. तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. त्याचवेळी हवेतील आर्द्रतेमुळे खेळाडूंना त्रास होत होता. इथल्या वातावरणाचा त्रास होत असल्याची तक्रार अनेक देशांनी केली आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमधील सुविधांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.(Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community