फक्त परदेशात नाही तर, भारतात देखील मासे (Guppy Fish Price) खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. भारतातील असंख्य नागरिकांना वेग-वेगळ्या प्रकारचे मासे खायला आवडतात. लग्न असो किंवा इतर कोणतीही पार्टी किंवा फंक्शनमध्ये लोक मासे खायला विसरत नाहीत. भारतात अनेक फिश मार्केट आहेत. जेथे अनेक प्रकारचे मासे मिळतात. तर आज जाणुन घेउया गप्पी माशाविषयी. (Guppy Fish Price)
गप्पी मासे हे उष्णकटिबंधीय जलचर प्राणी असून त्यांना मिलिअन फिश किंवा रेनबो फिश असे सुद्धा म्हणले जाते. हे गोड्यापाण्यातील मासे असून यांची उत्पत्ती ईशान्य दक्षिण अमेरिकन उपखंडात झालेली आहे. आजमितीस हे मासे विविध उप-प्रजाती सहित जगभर आढळतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, भिन्न पर्यावरण स्थितीत, विविध तापमानात हे मासे सहज जिवंत राहू शकतात. विविध प्रकारचे शैवाल आणि डासांचे डिंबक हे यांचे मुख्य अन्न आहे. आणि यामुळेच भारतात हिवताप निर्मूलन विभागातर्फे हे मासे खुल्या पाण्यात, डबक्यात आणि नाल्यात सोडली जातात. (Guppy Fish Price)
गप्पी मासे गोड्या किंवा मचूळ पाण्यात, तळ्यांमध्ये व संथ नद्यांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आढळतात. गप्पी नराची लांबी २-३ सेंमी., तर मादीची ४-६ सेंमी. असते. छोटे आकारमान, आकर्षक रंग, बहुप्रसवता आणि कणखरपणा या गुणधर्मांमुळे गप्पी माशाला घरगुती जलजीवालयात महत्त्वाचे स्थान आहे. (Guppy Fish Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community