येमेन येथील खालिद १० वर्षे निर्वासित म्हणून राहतोय, आता मुलाला नागरिकत्व द्या म्हणतो; Bombay High Court ने सुनावले

भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका. पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.

194

२०१४-१५ मध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध सुरु असताना तेथील नागरिक शेजारील राष्ट्रांत पळून गेले होते, तसा खालेद हुसेन हादेखील भारतात आला आणि पुण्यात राहू लागला. त्याने निर्वासिताचे प्रमाणपत्रही मिळवले. इथेच त्याला दोन मुले झाली. आता त्याची मुदत संपली म्हणून पोलिसांनी त्याला देश सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा कायद्यातील पळवाट शोधत माझी मुले इथे जन्मली म्हणून त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, अशी मागणी करू लागला आहे. त्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली. न्यायालयाने खालिदला चांगलेच सुनावले आणि देश सोडून जाण्याचे फर्मान काढले.

काय म्हणतो खालिद? 

आपण लवकरच ऑस्ट्रेलियात जाणार आहे. तेथील व्हिसासाठी प्रक्रिया चालू आहे. तोपर्यंत मला भारतात राहू द्या. परदेशी दांपत्याचे बाळ येथे जन्माला आल्यानंतर त्याला भारताचे नागरिकत्व मिळते; मात्र आमच्या मुलांना येथील नागरिकत्व का दिले जात नाही?

(हेही वाचा Sachin Waze on Anil Deshmukh: वसुली प्रकरणात सचिन वाझेंकडुन नवा गौप्यस्फोट; अनिल देशमुख यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख)

काय म्हटले न्यायालय? 

यावेळी सरकारी वकिल संदेश पाटील यांनी याला विरोध करत गेली अनेक वर्षे हुसेन भारतात वास्तव्यास आहे; मात्र निर्वासित असल्याने त्याला नियमानुसार आता भारतात रहाता येणार नाही. त्याचे कुटुंबही भारतात अनधिकृतपणे रहात आहे. त्यामुळे त्याच्या मुलांना येथील नागरिकत्व देता येणार नाही. त्यावर न्यायालय (Bombay High Court) म्हणाले की, भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका. पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा. जगातील १२९ देशांमध्ये तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला ऑस्ट्रेलियातच का जायचे आहे ?, असे खडेबोल मुंबई उच्च न्यायालयानेे (Bombay High Court) येमेनचा नागरिक आणि कुटुंबासह पुण्यात १० वर्षे रहाणारा निर्वासित खालेद हुसेन याला सुनावले.

काय आहे प्रकरण?

वर्ष २०१४-१५ मध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध चालू झाले. त्या वेळी तेथील अनेक नागरिक देश सोडून अन्य देशांत गेले. त्याच वेळी बहिणीच्या कर्करोगावरील उपचारासाठी खालेद हुसेन याची पत्नी भारतात आली होती. तसा व्हिसाही तिला मिळाला होता. त्यानंतर हुसेन शिकण्यासाठी भारतात आला; मात्र त्याच्याकडे तसा व्हिसा होता. युद्धामुळे हुसेनचे कुटुंब पुढे भारतातच राहिले. कालांतराने त्याला निर्वासित असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर त्याला एक मुलगा आणि मुलगी झाली; मात्र आता पुणे पोलिसांनी त्याला देश सोडून जाण्याची नोटीस दिल्याने हुसेन न्यायालयात (Bombay High Court) गेला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.