Odisha : ममता मोहंता यांचा भाजपा प्रवेश राज्यसभेसाठी महत्त्वाचा

144
Odisha : ममता मोहंता यांचा भाजपा प्रवेश राज्यसभेसाठी महत्त्वाचा

ओडिशामध्ये भाजपाची सत्ता आली आहे. याच बळावर राज्यसभेत खासदारांची संख्या वाढविण्यासाठी ओडिशामधील माजी राज्यसभा खासदार ममता मोहंता यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला असल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे. तसेच ममता मोहंता यांनी बीजू जनता दल आणि राज्यसभेतून राजीनामा दिल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे ओडिशामधील (Odisha) कुडुमी समुदायाच्या एक नावाजलेल्या नेत्या ममता मोहंता यांनी आपला राज्यसभेचा कार्यकाळ संपण्याच्या दोन वर्षे आधीच राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याकडे भाजपाची राजकीय खेळी म्हणून बघितले जात होते. त्याप्रमाणे त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.

४८ वर्षीय ममता मोहंता या मार्च २०२० मध्ये बीजू जनता दलाच्या राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या. त्या २०२० मध्ये ओडिशाच्या चार जागांपैकी त्यांच्या जागेवरून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता बीजेडीचे राज्यसभेत आठ सदस्य आहेत. भाजपामध्ये दाखल झालेल्या ममता म्हणाल्या की, मी कोणत्याही षडयंत्रामुळे भाजपामध्ये प्रवेश केला नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्शाने प्रेरित आहे. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने लोकांची सेवा करतात ते मला प्रेरणा देते. त्यामुळेच मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.

(हेही वाचा – Kiran Pawaskar : उबाठाच्या राज्यात जनता वाऱ्यावर अन् लाडका मुलगा योजना जोरावर)

मोहंता यांच्या राजीनाम्याचा भाजपाला होणार फायदा 

विधानसभेतील सदस्य संख्येच्या गणितानुसार ही जागा भाजपाच्या हातात जाईल. ओडिशा (Odisha) मधून एकूण दहा राज्यसभा खासदार आहेत. राज्याची सत्ता भलेही भाजपाच्या ताब्यात असेल, मात्र ओडिशामधून भाजपाच्या खात्यात आता केवळ एकच राज्यसभा खासदार आहे, उर्वरीत जागांवर बीजू जनता दलाच्या नेत्यांचा ताबा आहे. मात्र आता जी निवडणूक होईल त्यात संख्याबळाच्या आधारावर भाजपाकडून अनेक खासदरांना ओडिशामधून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. गणितानुसार ही जागा भाजपाच्या हातात जाईल. मात्र आता जी निवडणूक होईल त्यात संख्याबळाच्या आधारावर भाजपाकडून अनेक खासदरांना ओडिशामधून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

मोहंता २०२० मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या आणि त्यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार होता. परंतु त्यांनी दोन वर्ष आधीच राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचा थेट भाजपाला फायदा होणार आहे. ममता मोहंता यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होईल. तर विधानसभेतील सदस्य संख्येच्या गणितानुसार ही जागा भाजपाच्या हातात जाईल. ओडिशा (Odisha) मधून एकूण दहा राज्यसभा खासदार आहेत. कारण, ममता मोहंता यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी तो तत्काळ मंजूर केला होता. ओडिशा राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य ममता मोहंता यांच्याकडून एक पत्र प्राप्त झालं आहे. ज्यामध्ये त्यांनी राज्यसभेतील त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी ते संविधानिकदृष्ट्या पडताळून बघितले आणि त्यांचा राजीनामा मान्य केला आहे. असं धनखड यांनी म्हटलं होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.