“तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे नेते…” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा पलटवार

129
“तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे नेते…” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा पलटवार
“तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे नेते…” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा पलटवार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांमध्ये राजकीय कलह वाढताना दिसत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील भाषणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार पलटवार केला आहे. निराशेमुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याचे फडणवीस म्हणाले. शनिवारी (०३ ऑगस्ट) भाषणानंतर त्यांनी आपण औरंगजेब फॅन क्लबचे खरेच नेते असल्याचे दाखवून दिले.” यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पुण्यात फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.  (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Olympic Games Paris 2024 : ‘पुरुष’ असूनही महिलांविरुद्ध बॉक्‍सिंग खेळणार्‍या इमेन खेलीफचा जगभरातून होतोय विरोध)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्याच्या (Shiv Sankalp Melawa, Pune) सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह (Union Home Minister Amit Shah) इकडे आम्हाला हिंदुत्व शिकवायला आला होता म्हणे. इथे मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण मुस्लीम कुटुंबासोबत गेलं होतं. तुम्ही त्यांच्यासोबत गेलं तर चालते. मग मेहबूबा मुफ्ती, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला तसेच, याशिवाय हिंदुत्व, राम मंदिर (Ram Mandir) आणि संसदेतून होणारी पाणीगळती या मुद्द्यांवरून उद्धव (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Shri Ram यांच्या अस्तित्वाचा पुरावा उपलब्ध नाही; डीएमकेच्या मंत्र्याने गरळ ओकली)

सचिन वाझे यांच्या पत्रावर फडणवीसांची प्रतिक्रिया


दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून केलेल्या दाव्याने आणि पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वसुली प्रकरणात त्यांनी माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि जयंत पाटील यांची नावे घेतली आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, सचिन वाझे यांचे आरोप मी केवळ माध्यमांमध्ये पाहिले आहेत. त्यांनी मला पत्र लिहिल्याचेही तुम्ही दाखवत आहात. गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात असल्याने शनिवारपर्यंत मला काहीच दिसले नाही. असे कोणतेही पत्र आले नाही तसेच ते पाहिल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही समोर येईल त्याचा योग्य तपास करू. असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Devendra Fadnavis)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.