Vishalgad हिंसाचारप्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस

167
Vishalgad हिंसाचारप्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड (Vishalgad) येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून १३ ऑगस्ट २०२४ पर्यंत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आयोगाने राज्य सरकारला नोटीस काढली आहे.

अतिक्रमणाच्या नावाखाली कट्टर उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनांनी मुस्लिम समाजावर केलेल्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या माझ्या तक्रारीची आयोगाने दखल घेतली आहे. माझ्या समाजातील संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबध्द आणि बांधील आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरूच राहील, असे शेख यांनी यासंदर्भात सांगितले.

(हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाकासमोरच Shivaji Park ला केले जाते विद्रुप)

विशाळगडावर (Vishalgad) कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम समाजावर अत्याचार करत असताना महाराष्ट्र पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते. त्यामुळे पोलिसांवरचा समाजाचा विश्वास उडाला आहे. त्यासाठी, हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याआधी रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र लिहून विशाळगड (Vishalgad) हिंसाचाराची सीआयडी चौकशी, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना तडीपार करण्याची आणि बाधितांना १५ दिवसांत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.