Richest Indian : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात जोरदार टक्कर

Richest Indian : ब्लुमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानींची आगेकूच.

187
Richest Indian : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात जोरदार टक्कर
  • ऋजुता लुकतुके

एकूण मालमत्तेच्या बाबतीत देशातील दोन बडे उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात पुन्हा एखदा जोरदार टक्कर होणार आहे. सध्या हा मान मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. तर गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पण लवकरच गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याची शक्यता आहे. कारण, सध्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Richest Indian)

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती वाढत आहे. मात्र, गौतम अदानी यांची संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे. जूनमध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी काही दिवसांनी लगेच त्यांना मागे टाकले होते. आता अदानी समूहाच्या कंपन्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं गौतम अदानी पुन्हा एकदा मुकेश अंबानींना टक्कर देत आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या ११४ अब्ज डॉलर्स आहे. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १११ अब्ज डॉलर्स आहे. अदानी समूहाची कामगिरी अशीच सुरू राहिली तर लवकरच ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात. (Richest Indian)

(हेही वाचा – Farmers : नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार ५९६ कोटी; अनिल पाटील यांची माहिती)

मुकेश अंबानी हे जगातील ११ व्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गौतम अदानी हे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बाराव्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी सध्या भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यासह ते जगात ११ व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या मागे १२ व्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत. मात्र, विशेष म्हणजे या वर्षी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १७.१७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दुसरीकडे, गौतम अदानी यांच्या संपत्तीत २६.९ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गुरुवारी, मुकेश अंबानी यांची संपत्ती ६८७ दशलक्ष डॉलरने वाढली आहे. तर गौतम अदानी यांची संपत्ती २.९० अब्ज डॉलरने वाढली आहे. (Richest Indian)

भारतातील आणखी तीन नावांचा या यादीतील ५० श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश आहे. यामध्ये शापूर मिस्त्री ४१.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ३५ व्या क्रमांकावर आहेत. तर शिव नाडर ३८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ४० व्या क्रमांकावर आहेत. तसेच सावित्री जिंदाल यांची संपत्ती देखील ३४.९ अब्ज डॉलर आहे. सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. यावर्षी त्यांची एकूण संपत्ती १०.२ अब्ज डॉलरने वाढली आहे. जगातील सर्वात श्रीमंत महिला फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स आहे. ज्यांची एकूण संपत्ती ८६.४ अब्ज डॉलर आहे. श्रीमंतांच्या यादीत त्या २० व्या क्रमांकावर आहेत. (Richest Indian)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंना Supreme Court कडून दिलासा मिळण्याची आशा उल्हास बापट यांनी सोडली)

जगातील सर्वात १० श्रीमंत व्यक्ती

इलॉन मस्क – २४१ अब्ज डॉलर
जेफ बेझोस – २०७ अब्ज डॉलर
बर्नार्ड अर्नॉल्ट – १८२ अब्ज डॉलर
मार्क झुकरबर्ग – १७७ अब्ज डॉलर
बिल गेट्स – १५७ अब्ज डॉलर
लॅरी पेज – १५३ अब्ज डॉलर
लॅरी एलिसन – १५२ अब्ज डॉलर
स्टीव्ह बाल्मर – १४५ अब्ज डॉलर
सर्जी ब्रिन – १४४ अब्ज डॉलर
वॉरेन बफे – १३६ अब्ज डॉलर (Richest Indian)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.