Wayanad Landslide : वायनाडच्या बचावकार्यात ‘या’ मराठमोळ्या महिला अधिकाऱ्याचे मोलाचे योगदान

181
Wayanad Landslide : वायनाडच्या बचावकार्यात 'या' मराठमोळ्या महिला अधिकाऱ्याचे मोलाचे योगदान
Wayanad Landslide : वायनाडच्या बचावकार्यात 'या' मराठमोळ्या महिला अधिकाऱ्याचे मोलाचे योगदान

केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलन होऊन मरण पावलेल्यांची संख्या २१८ वर पोहोचली आहे, तसेच २०६ जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचावकार्यासाठी लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपच्या जवानांनी सुमारे अविश्रांत परिश्रम करून चुरालमला येथे १९० फुटांचा एक बेली ब्रिज बांधला. त्या तुकडीचे नेतृत्व मराठमोळ्या महिला लष्करी अधिकाऱ्याने केले. मेजर सीता शेळके (Major Sita Shelke) असे त्यांचे नाव आहे. (Wayanad Landslide)

(हेही वाचा – लोक इतके त्रस्त होतात की, त्यांना फक्त कोर्टापासून मुक्ती हवी असते; सरन्यायाधीश D. Y. Chandrachud यांनी व्यक्त केली चिंता)

कोण आहेत सीता शेळके ?

सीता शेळके या २०१२मध्ये भारतीय लष्करात दाखल झाल्या. मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये त्या ग्रुप मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्या मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून चेन्नई ओटीए येथून त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते.

बचावकार्य अंतिम टप्प्यात

केरळच्या मुंडक्काई आणि चुरालमला या भागांमध्ये झालेल्या दुर्घटनेत मोठमोठे दगड, माती, चिखल यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेली व त्यात शेकडो लोक अडकून पडले. त्यांच्या सुटकेसाठी बचावकार्य अहोरात्र सुरू आहे. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले आहेत का, याचा झेव्हर रडार आणि चार रिको रडारमार्फत शोध घेतला जात आहे. केरळ सरकारच्या विनंतीवरून ही रडार विशेष विमानाने दिल्लीहून त्या राज्यात आणण्यात आली. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळी सुरू असलेले बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध दरडींच्या ढिगाऱ्याखाली घेतला जात आहे.

या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २१८ – जणांचा मृत्यू झाला आहे. यात ९० महिला मृत झाल्या आहेत, तर ९८ – पुरुषांचा मृत्यू झाला आहे. यात ३० मुलांचा बळी गेला आहे. मृतांपैकी १५२ जणांची ओळख पटली आहे. या दुर्घटनांमध्ये ५१८ जण जखमी झाले आहेत. (Wayanad Landslide)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.