Pune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

240
Pune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग
Pune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ (Pune Rain) जारी केला आहे. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला (Khadakwasla) धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातल्या डेक्कन परिसरात नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे 15 घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. पुलाची वाडी आणि प्रेमनगरमधल्याही 100 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीनं बंद करण्यात आला आहे. (Pune Rain)

धरण क्षेत्रात अतिवृष्टी

कोयना धरणक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Pune Rain)

अतिमुसळधार पावसाची शक्यता

तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. या तिन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दुसरीकडे ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Pune Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.