Accident News : उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 7 ठार 40 जखमी

168
Accident News : उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 7 ठार 40 जखमी
Accident News : उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 7 ठार 40 जखमी

उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर (Lucknow-Agra Expressway), उसराहर परिसरात एक अनियंत्रित कार रस्त्याच्या पलीकडे गेली आणि रायबरेलीहून येणाऱ्या (Accident News) स्लीपर बसला धडकली. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या 20 फूट खाली खड्ड्यात पडून 7 जण ठार तर 40 जखमी झाले. पोलीस दलाने मानवी साखळी करून जखमींना बाहेर काढले.

(हेही वाचा –PFI शी संबंधित मौलवीने हिंदु मुलीचे केले धर्मांतर; १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद)

नागालँडची स्लीपर बस 60 प्रवासी घेऊन रायबरेलीहून दिल्लीला जात होती, तर दुसरीकडे आग्राहून लखनऊला जाणारी कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. अनियंत्रित कार दुभाजक ओलांडून या रस्त्यावर आली. अचानक समोरून आलेल्या कारला वाचवण्यासाठी बसचालक साईडला गेला, मात्र कारला धडक बसल्याने दोन्ही वाहने जोराचा आवाज करत रस्त्याच्या कडेला सुमारे 20 फूट खाली खड्ड्यात पडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. (Accident News)

(हेही वाचा –Intelligence firm च्या सर्वेक्षणात PM Modi हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते)

माहिती मिळताच एसएसपी संजय वर्मा, एएसपी सत्यपाल सिंह, एसडीएम सदर राघव विक्रम, सीओ सैफई शैलेंद्र प्रताप गौतम आणि जवळपासच्या पोलीस ठाण्यांतील अनेक अधिकारी आणि दल घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मानवी साखळी तयार करून जखमींना बाहेर ओढले आणि सैफई येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. या अपघातात कार आणि बसमधून प्रवास करणाऱ्या 7 जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित 40 जण जखमी झालेत. यापैकी अनेक जण लखनऊ, रायबरेली आणि अमेठीतील रहिवासी आहेत. तर अपघातग्रस्त कार कन्नौजच्या गद्दाईया उसर गावातील आहे. दरम्यान अपघातातील किरकोळ जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांची इतर वाहनाने व्यवस्था करण्यात आली. (Accident News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.