Pune Rain : पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे स्थलांतरणाचे आदेश!

217
Pune Rain : पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे स्थलांतरणाचे आदेश!
Pune Rain : पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे स्थलांतरणाचे आदेश!

पुण्यातील एकतानगर भागात पुराचं पाणी (Pune Rain) शिरण्यास सुरुवात झाली आहे. एकतानगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी भरलं आहे. खडकवासला (Khadakwasla) धरणातून मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील एकतानगरचा भाग जलमय झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

नागिरकांचे स्थलांतर करण्याचे आदेश

या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर आदेश दिले आहेत. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली आहे. शिंदे यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचेही अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. (Pune Rain)

पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करावी

शनिवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसहीत त्यांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मनसेनं पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार व्हावा अशी मागणी अजय शिंदे, बाळा शेडगे आणि रणजित शिरोळे यांनी केली होती. पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकता नगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करावी. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा अशी मागणी देखील केली होती. (Pune Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.