हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Middle Vaitarna Dam देखील पूर्ण भरले यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण भरलेला पाचवा तलाव

168
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Middle Vaitarna Dam देखील पूर्ण भरले यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण भरलेला पाचवा तलाव
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे Middle Vaitarna Dam देखील पूर्ण भरले यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण भरलेला पाचवा तलाव

Jबृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ जलाशयांपैकी ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ (Middle Vaitarna Dam) आज दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्ण भरले आहे. ज्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ७०६.३० क्युसेक या दराने जल विसर्ग सुरू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

(हेही वाचा- गरज नसेल, तर Lebanon ला जाऊ नका; भारत सरकारचे आवाहन)

गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray) मध्य वैतरणा जलाशय’ देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ५ तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.

Untitled design 2024 08 04T135211.801

आज मध्यरात्र भरलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची (Middle Vaitarna Dam) कमाल पाणी साठवण क्षमता ही १९३,५३० दशलक्ष लिटर (१९,३५३ कोटी लीटर) इतकी आहे.

Untitled design 2024 08 04T135259.684

बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण (Middle Vaitarna Dam) सन २०१४ मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे करण्यात आले आहे.

(हेही वाचा- Pune Rain : पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे स्थलांतरणाचे आदेश!)

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के इतका जलसाठा आहे. (Middle Vaitarna Dam)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.