Pune Khadakwasla Dam : पुण्यात धरणांतून सोडलेले पाणी शहरात शिरण्याचा धोका, सतर्कतेचे आवाहन

279
Pune Khadakwasla Dam : पुण्यात धरणांतून सोडलेले पाणी शहरात शिरण्याचा धोका, सतर्कतेचे आवाहन
Pune Khadakwasla Dam : पुण्यात धरणांतून सोडलेले पाणी शहरात शिरण्याचा धोका, सतर्कतेचे आवाहन

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली असून, सध्या या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच येत्या तीन ते चार तासांत जिल्ह्यातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे कोणत्याही क्षणी खडकवासला प्रकल्पातून सध्याच्या तुलनेत अधिक पाणी सोडण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे. (Pune Khadakwasla Dam) त्यामुळे शहरातील काही भागांत धरणांतून सोडलेले पाणी शिरण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

(हेही वाचा – CNF Meaning In Railway : रेल्वे तिकिटावर CNF का लिहिलेले असते ?)

महापालिकेचे संपर्क क्रमांक जारी

पुण्यातील ज्या भागांत पाणी शिरण्याचा धोका आहे, अशा भागांत महापालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी पथक नियुक्त केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता मदतीची गरज भासल्यास पालिकेच्या ०२५५०१२६९ किंवा २५५०६८०० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही भोसले यांनी आवाहनात म्हटले आहे. (Pune Heavy Rain)

एकता नगरीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीतील द्वारका सोसायटीमध्ये रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने एकता नगरीतील सर्व सोसायट्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविलेला आहे. नागरिकांनी त्यांच्या पार्किंगमधील दुचाकी आणि चारचाकी वाहने काढून घ्यावीत, तसेच घरातील अत्यावश्यक व महत्त्वाचे साहित्य घेऊन पूरग्रस्त निवारा केंद्रामध्ये जावे असे आवाहन केले आहे. (Pune Khadakwasla Dam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.