TRAI: नेटवर्क खंडित झाल्यास कंपनीला द्यावी लागणार नुकसान भरपाई; सरकारने दिले आदेश, जाणून घ्या 

154
TRAI: नेटवर्क खंडित झाल्यास कंपनीला द्यावी लागणार नुकसान भरपाई; सरकारने दिले आदेश, जाणून घ्या 
TRAI: नेटवर्क खंडित झाल्यास कंपनीला द्यावी लागणार नुकसान भरपाई; सरकारने दिले आदेश, जाणून घ्या 

इंटरनेट सेवा खंडीत (Internet service interrupted) झाल्यास आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ऑनलाईन पेमेंट (Online payment), मॅसेज, कॉल, किंवा इतर कोणतीही ऑनालईन कामं आपण करू शकत नाही. काही टेलिकॉम कंपन्याची नेटवर्क सेवा सतत विस्कळीत होते, त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. टेलिकॉम कंपन्यांची नेटवर्क सेवा कितीही तास खंडीत झाली तरी याचा सर्वात जास्त परिणाम संबंधित कंपनीच्या ग्राहकांवर होतो. आता ग्राहकांच्या ह्याच समस्या लक्षात घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एक निर्णय जारी केला आहे.  (TRAI)

आता मिळणार नुकसान भरपाई

ट्रायचे म्हणणं आहे की, जर टेलिकॉम कंपनीनं (Telecom Company) क्वालिटी स्टँडर्डचं पालन केलं नाही तर त्यांना मोठा दंड भरावा लागेल. पूर्वी दंडाची रक्कम ५० हजार रुपये होती, ती आता वाढवून १ लाख रुपये करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा निर्णय टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी डोकेदुखी ठरू शकतो.

ट्रायनं आपल्या जुन्या नियमांमध्ये काही बदल केलं असून दंडाची रक्कमही वेगवेगळ्या स्वरूपात विभागण्यात आली आहे. ब्रॉडबँड आणि वायरलाइन, वायरलेस सर्व्हिसेस रेग्युलेशन, २०२४ चे उल्लंघन केल्यास ही रक्कम भरावी लागणार आहे. दंडाची रक्कम एक लाख, दोन लाख, पाच लाख आणि दहा लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच आता दंडही वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे. (TRAI)

(हेही वाचा – Pune Khadakwasla Dam : पुण्यात धरणांतून सोडलेले पाणी शहरात शिरण्याचा धोका, सतर्कतेचे आवाहन)

१२ तासांचा एक दिवस

ट्रायच्या या नियमामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो आणि टेलिकॉम कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. कारण समजा एखादं नेटवर्क सलग १२ तास बंद पडलं तर ते १ दिवस म्हणून गणले जाईल. उदाहरणार्थ, जर नेटवर्क सलग १२ तास ठप्प असेल तर कंपन्या ग्राहकांना १ दिवस अधिक वैधता देतील. (TRAI)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.