पिंपरी-चिंचवड येथे ४ Bangladeshi infiltrators यांना अटक

सागोर बिश्वास, देब्रोतो बिश्वास, जॉनी बिश्वास आणि रोनी सिकंदर अशी त्यांची नावे आहेत.

149

गेल्या काही वर्षांपासून ४ बांगलादेशी हे घुसखोरी (Bangladeshi infiltrators) करून पिंपरी-चिंचवडसह पुण्यामध्ये रहात होते. त्यांच्याकडे जन्म दाखला, आधारकार्ड आणि पॅन कार्ड अशी बनावट कागदपत्रे मिळाली असून त्यातील २ जणांनी त्या कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी घुसखोरांना अटक केली आहे.

(हेही वाचा Accident News : उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 7 ठार 40 जखमी)

सागोर बिश्वास, देब्रोतो बिश्वास, जॉनी बिश्वास आणि रोनी सिकंदर अशी त्यांची नावे आहेत. सागोर हा सांगवी पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी गेला होता. पारपत्र आणि चारित्र्य पडताळणी करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला संशय आला. दिलेल्या कागदपत्रांनुसार पुढील चौकशी केली असता सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पुनावळे आणि पुणे कॅम्प भागातून अजून ३ बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) अटक करण्यात आली. या ४ जणांनी अवैधरित्या भारतामध्ये घुसखोरी केल्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.