आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर (Visakhapatnam Railway) रविवारी (४ ऑगस्ट) एका रेल्वेला आग (Train Fire) लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कोरबा येथून विशाखापट्टणममार्गे तिरुमला येथे जाणाऱ्या ट्रेनला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर थांबली असता एम1, बी7 आणि बी6 या वातानुकूलित डब्यांमध्ये आग लागली. बी7 डब्याच्या शौचालयात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
स्थानकावर गोंधळाचे वातावरण
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये ट्रेनच्या डब्यातून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसतात. दरम्यान, स्थानकावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
(हेही वाचा – Pune Khadakwasla Dam : पुण्यात धरणांतून सोडलेले पाणी शहरात शिरण्याचा धोका, सतर्कतेचे आवाहन)
उत्तरप्रदेशमध्ये रुळावरून घसरली ट्रेन
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर रेल्वे स्थानकापासून (Saharanpur Railway Station) 100 मीटर अंतरावर 01619 प्रवासी रेल्वे रुळावरून घसरली. अपघातानंतर ट्रेनचे इंजिन जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रेनला धडकले. रेल्वे रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
(हेही वाचा –Wayanad Landslides नंतर पुन्हा पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील मसुदा जारी )
रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले असून, ही ट्रेन सहारनपूरहून दिल्लीला येत होती. या घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत तसेच बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रवाशांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. रेल्वेचे अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community