Bangladesh मध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; ३२ जणांचा मृत्यू

182
बांगलादेशात (Bangladesh) आरक्षणाच्या मुद्यावरून पेटलेले आंदोलन दोन आठवडे शांत झाल्यानंतर पुन्हा पेटले आहे. यावेळी हिंसाचारी जमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. रविवारी आंदोलकांनी केलेल्या हिंसेत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत असहकार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंदोलक आले होते. अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि स्टेन ग्रेनेडचाही वापर केला. या सर्व प्रकारामुळे बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी आणि आरक्षणाबाबत सुधारणेबाबत झालेल्या आंदोलनात मृत व्यक्तींच्या वारसांना न्याय देण्याची मागणी आंदोलनकर्ते करत होते.
असहकार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राजधानीतील सायन्स लॅब चौकात लोकांनी एकत्र येत सरकारविरोधी घोषणा दिल्या. ढाका येथील सायन्स लॅब, धानमंडी, मोहम्मदपूर, टेक्निकल, मीरपूर-१०, रामपुरा, तेजगाव, फार्मगेट, पंथपथ, जत्राबारी आणि उत्तरा येथेही निदर्शने आणि रॅली काढण्यात येणार असल्याचे निदर्शनाच्या आयोजकांनी सांगितले. सरकारी नोकऱ्यांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील (Bangladesh) विद्यार्थ्यांनी एका महिन्याहून अधिक काळ आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे देशभरात हिंसा भडकली, त्यात कमीत कमी २०० लोकांचा मृत्यू झाला होता. आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने पाठिंबा दिलेल्या काही गटांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.