Artical 370 च्या अंताची 5 वर्षे; अखेर जम्मू – काश्मीर ‘मुक्त’ झाला

5 ऑगस्ट 2019 पासून, या प्रदेशात एकूण 5,319.35 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये औद्योगिक क्षेत्राने मोठ्या प्रमाणात इंट्रेस्ट घेतला आहे, कलम 370 रद्द केल्यानंतर लागू करण्यात आलेली सरकारची सक्रिय धोरणे आणि प्रोत्साहने महत्त्वपूर्ण ठरली आहेत.

191

5 ऑगस्ट 2019 रोजी, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 चा (Artical 370) प्रभाव रद्द केला, तसेच राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश केले. याला सोमवार, 5 ऑगस्ट 2024 रोजी 5 वर्षे पूर्ण होत आहेत.

5 ऑगस्ट 2019 रोजी, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 चा (Artical 370) प्रभाव रद्द केला, तसेच राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश केले. केंद्राच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात २३ अर्ज दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांची सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने सप्टेंबरमध्ये निर्णय राखून ठेवला होता. 370 रद्द केल्यानंतर 4 वर्षे, 4 महिने आणि 6 दिवसांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

(हेही वाचा Hindu मतांसाठी भाजपा मुंबईतील ३६ मतदारसंघांत करणार चाचपणी)

या निर्णयामागे न्यायालयाची काय होती निरीक्षणे?

  • राष्ट्रपतींना कलम 370 (Artical 370) काढून टाकण्याचा अधिकार आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या योग्य होता.
  • संविधानातील सर्व तरतुदी जम्मू-काश्मीरला लागू होतात. हा निर्णय जम्मू आणि काश्मीरच्या एकीकरणासाठी होता.
  • कलम 370 हटवण्यात कोणताही दुजाभाव नव्हता.
  • जम्मू-काश्मीरमध्ये लवकर निवडणुकांसाठी पावले उचलावीत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणुका व्हाव्यात.
  • जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरच राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा.
  • कलम 370 (Artical 370) ही तात्पुरती तरतूद होती. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. जम्मू-काश्मीरला अंतर्गत सार्वभौमत्व नव्हते.
  • लडाख वेगळे करण्याचा निर्णय कायदेशीर आहे.

5 ऑगस्ट 2019 पासून, या प्रदेशात एकूण 5,319.35 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये औद्योगिक क्षेत्राने मोठ्या प्रमाणात इंट्रेस्ट घेतला आहे, कलम 370 रद्द केल्यानंतर लागू करण्यात आलेली सरकारची सक्रिय धोरणे आणि प्रोत्साहने महत्त्वपूर्ण ठरली आहेत. प्रदेशाला 42 विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये 84,544 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. गुंतवणुकीमध्ये उत्पादन, तंत्रज्ञान आणि पर्यटन यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात, स्थानिक उद्योगांना चालना मिळते आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात हातभार लागतो. J&K मध्ये पर्यटन उद्योगानेही लक्षणीय वाढ आहे. या प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. 2020 मध्ये 34,70,834 पर्यटकांनी J&K ला भेट दिली आणि तेव्हापासून या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी ही संख्या 2,11,24,874 वर पोहोचली; आणि या वर्षाच्या जूनपर्यंत, 1,08,41,009 पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली आहे, हे मोठे ध्येय प्राप्त केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.