केंद्रीय मंत्री Amit Shah म्हणतात; २०२९ मध्ये पुन्हा…

160
केंद्रीय मंत्री Amit Shah म्हणतात; २०२९ मध्ये पुन्हा…
केंद्रीय मंत्री Amit Shah म्हणतात; २०२९ मध्ये पुन्हा…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी (४ ऑगस्ट २०२४) चंदीगडच्या भेटीदरम्यान मणिमाजरा येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन (Inauguration of Manimajra Water Project) केले. यावेळी त्यांनी तेथील जनतेला संबोधित करताना २०२९ मध्येही एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होणार असून पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचा दावा केला. यावेळी  गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, एनडीए सरकार केवळ आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही, तर पुढील कार्यकाळही या सरकारचा असेल. दरम्यान, भाषणात यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.

(हेही वाचा – Bangladesh मध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; ३२ जणांचा मृत्यू)

अमित शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधला

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या. विरोधकांवर खरपूस समाचार घेत ते म्हणाले, “इंडि आघाडीला (India Alliance) अस्थिरता निर्माण करायची आहे, त्यांना विरोधी पक्षात कसे काम करायचे ते शिकावे लागेल. विरोधी पक्षातील लोक वारंवार सांगतात की, हे सरकार चालणार नाही. मी त्यांना आश्वासन देण्यासाठी आलो आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून पुढील निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार (Modi Govt 2029) स्थापन करेल.  

(हेही वाचा – Mhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई विभागातील २००० घरांसाठी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिरात निघणार)

स्मार्ट सिटी चंदीगडवर १ लाख कोटी झाले खर्च  

तसेच स्मार्ट सिटी मिशनचा (Smart City Mission) शुभारंभ करताना गृहमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून स्मार्ट शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि या यादीत चंदीगड पहिल्या स्थानावर आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत १ लाख कोटी रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.