Manu Bhaker : भगवद्गीता विरूद्ध आतंकवाद!

167
Manu Bhaker : भगवद्गीता विरूद्ध आतंकवाद!
Manu Bhaker : भगवद्गीता विरूद्ध आतंकवाद!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

भारतीय विचारप्रवाह हा ओरबाडण्यावर विश्वास ठेवत नाही. कोणतीही गोष्ट ओरबाडून मिळवायची नसते. ओरबाडणे म्हणजेच बलात्काराने मिळवणे आणि हिंदू भावविश्वात बलात्कार महापाप आहे. लाक्षागृहामध्ये पांडवांना कपटाने मारण्याचा प्रयत्न झाला. अश्वत्थामाने पांडवांच्या मुलांना ते बेसावध व झोपेत असताना मारुन टाकले. याचा प्रतिशोध पांडवांनी कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार पौरुषी बलाने घेतला आहे. यामध्ये काही धूर्त राजकीय खेळी असू शकतात, मात्र मानवी मूल्ये पायदळी तुडवली गेली नाहीत.

प्रभू श्रीरामांचे चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांचा भगद्गीतेतील उपदेश आजही केवळ हिंदुंनाच नव्हे तर सबंध जगाला मार्गदर्शन करत आहे. असे कितीतरी उदाहरणे दाखवता येतील, या दोन महापुरुषांच्या प्रेरणेने लोकांनी आपले जीवन उजळून टाकले आहे. त्याचबरोबर समाजालाही प्रकाशमान केल्याची उदाहरणे आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये निराशेला सामोरे जावे लागल्यानंतर मनू भाकर (Manu Bhaker) यांचे आई-वडील रामकिशन आणि सुमेधा भाकर यांनी मनूसोबत भगवद्गीतेचे पठण केले आणि यातून मनूला प्रेरणा मिळाली. असे मनूने मुलाखतीत सांगितले आहे.

(हेही वाचा – Milk Donation : १० हजारांहून अधिक नवजात बालकांना दुग्धदानामुळे मिळाले जीवनदान)

तिच्या या वक्तव्यानंतर काही लोकांना नको त्या जागी मिरची झोंबली असल्यामुळे त्यांनी मनू आणि मनुस्मृती अशी डॅम्बिस तुलना केली. म्हणे मनुस्मृती नव्हती म्हणून मनू पदक मिळवू शकली. हे लोक मानसिक रुग्ण असून, निराशेच्या खोल दरीत पडले आहेत. त्यामुळे नकारात्मकता यांच्या अंगाअंगात भिनली आहे. त्याऐवजी भगवद्गीता होती म्हणून मनू जिंकली असेही म्हणता आले असते. पण कसे म्हणणार? श्रीकृष्ण तर हिंदुंचा देव, त्यात कृष्ण हा हिंदुंना शस्त्रसज्ज राहायला शिकवतो. युद्धास सज्ज राहायला शिकवतो. त्यामुळे हा विरोध आहे. खेळात धर्म कशाला आणायचा? वगैरे बालिश वक्तव्ये सुरु होतात. मुळात हिंदू हा अत्यंत धार्मिक माणूस आहे. राज्यकर्ता राज्यकर्त्यासारखा वागला तर आपण त्याने राज’धर्म’ पाळला, असे म्हणतो. कुणी चांगला वागला, नितीमत्तेने वागला तर आपण म्हणतो की तो धर्माने वागला आहे. त्यामुळे धर्म सगळीकडे आहे. तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

उलट मनू भाकरच्या (Manu Bhaker) वक्तव्याची तुलना जागतिक घडामोडींशी करुन पाहायला हवी. हमास, इसिस किंवा तत्सम अतिरेकी संघटना एका विशिष्ट ग्रंथाचा आदर्श घेऊन जगात हैदोस माजवतात, निरपराध लोकांचा बळी घेतात. त्याउलट नुकतीच वयात आलेली २२ वर्षांची तरुणी धर्मग्रंथाचा आदर्श घेऊन पदके पटकावते. किती ही मोठी तफावत आहे? यावरुन या तरुण मुलीचे कतृत्व लक्षात येतेच त्याचबरोबर हिंदू धर्मग्रंथाची महानताही दिसून येते. हिंदू धर्मग्रंथ लोकांना जगण्याची प्रेरणा देतो, लोकांना जगवण्यासाठी प्रोत्साहित करतो, मानवी मूल्ये रुजवण्यासाठी आणि पुनर्स्थापित करण्यासाठी प्रेरित करतो, ‘वसुधैव कुटुंबकम’ हा जागतिक शांततेचा मूलमंत्र प्रदान करतो. या पार्श्वभूमीवर मनू भाकरचे (Manu Bhaker) वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन मनूने स्वतःची एक स्मृती निर्माण केली आहे. या अर्थाने ती मनुस्मृती ठरेल!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.