- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा विजयरथ एकदिवसीय सामन्यात का होईना पहिल्यांदा श्रीलंकन संघाने अडवला आहे. दुसऱ्या एकदिवसीय लढतील लंकन संघाने भारताला २०८ धावांतच गुंडाळलं. सामनाही ३२ धावांनी जिंकला. सामन्यावर गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. आणि त्याचवेळी भारतीय फलंदाजांचं अपयशही दिसून आलं. कारण, तगड्या फलंदाजांच्या फळीला पूर्ण ५० षटकंही खेळून काढता आली नाहीत. (Ind vs SL, 2nd ODI)
(हेही वाचा- Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू; संचारबंदी लागू)
श्रीलंकन संघाने पहिली फलंदाजी करताना ९ बाद २४० धावा केल्या. खरंतर त्यांचीही सुरुवात अडखळतीच होती. निम्मा संघ १३६ धावांत गारद झाला होता. अविस्का फर्नांडोने (Avishka Fernando) ४० आणि कुसल मेंडिसने (Kusal Mendis) ३० धावा केल्यानंतर इतर फलंदाजांनी तशी निराशाच केली. पण, तळाला वेल्लालगेने ३९ आणि कामेदू मेंडिसने ४० धावा करत श्रीलंकन संघाला चक्क २४० धावांपर्यंत पोहोचवलं. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) ३० धावांत ३ तर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) ३३ धावांत दोन बळी घेतले. (Ind vs SL, 2nd ODI)
Sri Lanka win the 2nd ODI by 32 runs.#TeamIndia will look to bounce back in the 3rd and Final #SLvIND ODI.
Scorecard ▶️ https://t.co/KTwPVvU9s9 pic.twitter.com/wx1GiTimXp
— BCCI (@BCCI) August 4, 2024
याला उत्तर देताना भारतीय संघाने दणदणीत सुरुवात केली होती. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी १३ षटकांतच ९७ धावांची सलामी संघाला करून दिली. यात रोहितने ४४ चेंडूंत ६४ धावा करताना ४ षटकारांची आतषबाजी केली होती. तर शुभमननेही ३५ धावा केल्या. पण, दोघंही लागोपाठ बाद झाल्यानंतर भारतीय मधली फळी कोसळली. विराट कोहली (Virat Kohli) (१४) पुन्हा एकदा पायचीत झाला. तर शिवम दुबे (Shivam Dube) (०), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) (७), के एल राहुल (KL Rahul) (०) आणि वॉशिंग्टन सुंदर (१५) झटपट बाद झाल्यामुळे धावगती चांगली असतानाही ५० षटकं खेळून काढणंही भारतीय संघाला कठीण गेलं. (Ind vs SL, 2nd ODI)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनचा आता मुकाबला कांस्य पदकासाठी; कुस्तीपटूही उतरणार रिंगणात )
भारताच्या पडझडीला कारणीभूत ठरला तो जेफरी वांदरसे. त्याने ३३ धावांत ६ बळी घेतले. पहिल्या चार भारतीय फलंदाजांना त्यानेच बाद केलं. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या विजयामुळे श्रीलंकन संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना ७ ऑगस्टला कोलंबोत होणार आहे. (Ind vs SL, 2nd ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community