Paris Olympic 2024 : हॉकीत अमित रोहिदासला रेडकार्ड, उपांत्य फेरीतील सहभाग अनिश्चित

Paris Olympic 2024 : यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे पहिलं रेड कार्ड आहे

160
Paris Olympic 2024 : हॉकीत अमित रोहिदासला रेडकार्ड, उपांत्य फेरीतील सहभाग अनिश्चित
Paris Olympic 2024 : हॉकीत अमित रोहिदासला रेडकार्ड, उपांत्य फेरीतील सहभाग अनिश्चित
  • ऋजुता लुकतुके

भारताचा आधाडीचा बचावपटू अमित रोहिदासला (Amit Rohidas) उपउपांत्य लढतीत ग्रेट ब्रिटनविरुद्ध मिळालेल्या रेडकार्डमुळे त्याचा उपांत्य फेरी सामन्यातील सहभाग अनिश्चित झाला आहे. भारताचा उपांत्य फेरीतील मुकाबल मंगळवारी होणार आहे. रोहिदास हा भारताचा पहिल्या फळीतील बचावपटू आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू; संचारबंदी लागू)

ग्रेट ब्रिटन विरुद्धही भारताला अमितच्या अनुपस्थितीचा फटका बसला. कारण, सामना सुरू होताच पंधराव्या मिनिटालाच अमित रोहिदासची (Amit Rohidas) हॉकी स्टिक प्रतिस्पर्धी खेळाडूला लागली. त्याला रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यानंतर जवळ जवळ ४५ मिनिटं भारतीय संघ मैदानात फक्त १० खेळाडूंसह खेळला. त्यामुळे ग्रेट ब्रिटनला भारतीय भागात हल्ले चढवणं सोपं गेलं. (Paris Olympic 2024)

 

अमितने प्रतिस्पर्धी खेळाडूकडून चेंडू हिसकावून घेण्याच्या नादात स्टिक खांद्याच्यावर नेली. नेमकी ती प्रतिस्पर्धी खेळाडूला लागली. तो खेळाडू मैदानावर कोसळला. अजाणतेपणाने झाला असला तरी तो गंभीर अपराध आहे. पंचांनी तातडीने अमित रोहिदास (Amit Rohidas) आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीतला (Harmanpreet) बोलावून तंबी दिली. अमितला रेडकार्ड दाखवलं. भारतासाठी हा मोठा धक्का होता. कारण, उर्वरित ४५ मिनिटं भारताला १० खेळाडूंसह खेळावं लागलं. आता त्याचा उपांत्य फेरीतील सहभागही अनिश्चित आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनचा आता मुकाबला कांस्य पदकासाठी; कुस्तीपटूही उतरणार रिंगणात )

कारण, फुटबॉलमध्ये रेडकार्ड मिळालं, तर खेळाडूला पुढचा सामनाही खेळता येत नाही. पण, हॉकीत रेडकार्ड मिळाल्यावर तेव्हाचं फुटेज पाहून रेफरी फेरआढावा घेतात. सामन्यानंतर निकाल जाहीर करतात. आधी सामन्याच्या वेळी मैदानात असलेले पंच आपला अहवाल तांत्रिक समितीला सादर करतील. ही समिती सामन्याचं फुटेज पाहून अमित रोहिदासविषयी (Amit Rohidas) निर्णय घेईल. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला मारलेला धक्का हा हेतुपुरस्सर होता, असं या समितीला वाटलं, तर त्याला पुढील सामना खेळता येणार नाही. खेळाच्या ओघात झालेला तो अपघात असेल तर समिती त्याला उपांत्य सामना खेळण्याची परवानगी देऊ शकते. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Jalyukt Shivar Yojana ची १ लाख कामे अद्यापही कागदावर)

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खांद्याच्या वर हॉकी स्टिक बसली तर तो गंभीर अपराध असतो. फक्त इथं अमितने ते हेतूपुरस्सर केलेलं नाही, असं त्याला सिद्ध करावं लागेल. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.