श्रावणातील पहिल्याच सोमवारी Omkareshwar Mandir पाण्याखाली, भाविक दर्शनाला मुकणार?

148
श्रावणातील पहिल्याच सोमवारी Omkareshwar Mandir पाण्याखाली, भाविक दर्शनाला मुकणार?
श्रावणातील पहिल्याच सोमवारी Omkareshwar Mandir पाण्याखाली, भाविक दर्शनाला मुकणार?

पुण्यात (Pune) गेले काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच घरणे ओसंडून वाहत आहेत. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे ओंकारेश्वर मंदिर (Omkareshwar Mandir) पाण्याखाली गेलं आहे.

(हेही वाचा –छत्रपती Sambhajinagar येथे ३० टन गोमांस जप्त)

श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावणातील पहिल्याच सोमवारी ओंकारेश्वर मंदिर (Omkareshwar Mandir) पाण्याखाली गेलं असल्यामुळे सध्या तरी भाविकांना दर्शन घेता येणार नाहीय. सध्याच्या परिस्थितीत पुराचे पाणी हे मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचले आहे. मात्र, पाणी दुपारर्यंत ओसरले तर, भाविकांसाठी मंदिर खुले केले जाउ शकते.

(हेही वाचा –Bangladesh हिंसाचारात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू; संचारबंदी लागू)

पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर आहेत. अनेक लोकांना पुराचा फटका बसला आहे. मागच्या पुरावेळी मृत्यू झालेल्या दोन तरुणांना दहा लाखांची मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय मदत जाहिर करणार याकडे लक्ष असेल. (Omkareshwar Mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.