महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, याची काळजी Sharad Pawar यांनी घ्यावी; Raj Thackeray यांनी मांडले परखड मत

130
महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, याची काळजी Sharad Pawar यांनी घ्यावी; Raj Thackeray यांनी मांडले परखड मत
महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, याची काळजी Sharad Pawar यांनी घ्यावी; Raj Thackeray यांनी मांडले परखड मत

शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे हे सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत भाष्य केले.

(हेही वाचा – Ind vs SL, 2nd ODI : श्रीलंकेची भारतावर ३२ धावांनी मात; टी-२० विश्वचषकानंतर भारताचा पहिली पराभव )

महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये, असे खोचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. शरद पवार हे महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करतात. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. ही चर्चा सुरु असतानाच आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीवादासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांनाच जबाबदार धरले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

असे वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, यापूर्वी भाजपच्या नेत्यांना मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाला शरद पवार यांचे पाठबळ असल्याचे आरोप केले होते. राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे कोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवून सुरु आहे. या माध्यमातून मतं हातात घेणं सुरु आहे. यापलीकडे ओबीसी किंवा मराठा मुलामुलींच्या भवितव्याचा विचार कोणाकडूनही केला जात नाही. हे केवळ मतांचं राजकारण आहे. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत, या सगळ्यातून हाताला काहीही लागणार नाही. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे. लहान लहान मुलं या आरक्षणाच्या वादामुळे आमची मैत्री तुटली असं सांगत होती, हे सगळं आता शाळा-कॉलेजपर्यंत गेलं आहे. हे चित्र भीषण आहे. असे वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते. ज्या महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीवेळी दूर ठेवले पाहिजे.

माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग

महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. जितक्या नोकऱ्या उपलब्ध होतात तितक्या दुसरीकडे होत नाही. केंद्र सरकार अनेक ठिकाणी खासगीकरण करत आहे. खासगी शिक्षणसंस्था आणि कंपन्यांमध्ये आरक्षण आहे का? मग किती नोकऱ्या उपलब्ध होणार. त्यामुळे आपण या सगळ्या बाबी नीट तपासल्या पाहिजेत. हा सगळा माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग आहे, असा दावा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.