सोनपूर येथील बाबा हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी कावड यात्रेकरू डीजे ट्रॉलीवर जात असताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी रात्री डीजे ट्रॉलीचा हायव्होल्टेज वायरशी संपर्क आल्याने यात्रेकरूंचा मृत्यू झाला. बिहारमधील हाजीपूरमधील औद्योगिक पोलिस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर गावात ही घटना घडली. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Bihar)
(हेही वाचा –महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, याची काळजी Sharad Pawar यांनी घ्यावी; Raj Thackeray यांनी मांडले परखड मत)
रात्री उशिरा सुलतानपूर गावात एक ट्रॉली एका हाय-टेंशन लाइनच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला. ट्रॉलीवरील सर्व यात्रेकरू पहेलेजा येथे गंगाजल भरून परतत होते आणि सोनेपूर येथील बाबा हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जात होते. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर हाजीपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Bihar)
(हेही वाचा –छत्रपती Sambhajinagar येथे ३० टन गोमांस जप्त)
मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, चंदन कुमार, कालू कुमार आणि आशिष कुमार यांचा समावेश आहे. ११ हजार व्होल्टच्या वायरशी संपर्क आल्याने हा अपघात झाला. एक प्रत्यक्षदर्शी आणि गावातील रहिवासी मधुरेंद्र कुमार यांनी सांगितले की ट्रॉली हरिहरनाथकडे जात होती. त्यावेळी ट्रॉलीवर बरेच लोक होते. यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत एकाच गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. (Bihar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community