बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आला आहे. या मेट्रो (Metro 3) मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाची ८६ टक्क्यांहून अधिक कामे पूर्णत्वास आली आहेत. त्यामुळे या मार्गाचे कामही पूर्ण होऊन तो लवकरच मुंबईकरांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनची आता लढत कांस्य पदकासाठी; लवलिनाचं पदक हुकलं)
बीकेसी ते आरे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. त्यावर एकूण २७ स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात मेट्रो ३ मार्गिकेचा बीकेसी ते आरे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके असतील. एमएमआरसीने आरडीएसओ पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी करून घेतली आहे. आता कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस)कडून तपासणी केली जाणार आहे. सीएमआरएसकडून प्रमाणपत्र प्राप्त होताच पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
या मेट्रो मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांची मिळून ९२.२ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, तर सिव्हिलची कामे ९९.३ टक्के पूर्ण झाली आहेत. सुरक्षा तपासणीला विलंब-मेट्रो ३ चा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा मेपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरसीने जाहीर केले होते. मात्र या मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीला विलंब झाला आहे. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
‘मेट्रो ३’ या मार्गिकेवर एकूण २७ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात १० स्थानकावर वाहतूक सुरू होणार आहे. आरे ते बीकेसी टप्प्याचे काम ९६.८ टक्के टक्के पूर्ण झाले आहे. बीकेसी ते कुलाबा टप्प्याचे काम ८५.९ टक्के पूर्ण झाले आहे. मेट्रो ३ (Metro 3) या संपूर्ण प्रकल्पाचे काम ९२.२ टक्के झाले आहे. संपूर्ण मार्गिकेचे सिव्हिल काम ९९.३ टक्के झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community