आजपर्यंतची सर्वात मोठी निवडणूक बदनाम करण्यासाठी खोटी मोहीम चालवली जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका (loksabha election 2024) अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडल्या. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात उमेदवार आणि स्टेकहोल्डर्सना सामील करण्यात आले आहे. निवडणुकीचा डेटा आणि निकाल कायद्याच्या अंतर्गत वैधानिक प्रक्रियेनुसार आहेत, अशी पोस्ट निवडणूक आयोगाने (Election Commission) रविवार, 4 ऑगस्ट रोजी केली आहे.
(हेही वाचा – Badlapur explosion: बदलापूरात रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; कंपनी बेचिराख)
काँग्रेसने केले होते बेछूट आरोप
3 ऑगस्ट रोजी काँग्रेस (Congress) नेते संदीप दीक्षित यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ‘व्होट फॉर डेमोक्रसी’ (Vote for Democracy) या संघटनेच्या अहवालाचा हवाला देत निवडणुकीच्या मतमोजणीत अनियमितता झाल्याचे आरोप केले होते. मतदानाच्या वेगवेगळ्या दिवशी रात्री 8 वाजता दिलेली मतदानाची टक्केवारी आणि काही दिवसांनी जाहीर होणारी अंतिम मतदानाची टक्केवारी यात मोठी तफावत आहे. काही राज्यांमध्ये 10 ते 12 टक्के मतांचा फरक असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. बूथवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान संपते. 7 वाजल्यानंतरही बूथवर इतके लोक होते का, त्यामुळे 10-12 टक्के जास्त मतदान झाले आणि काही दिवसांनी जाहीर झालेल्या अंतिम मतदानात मतांची टक्केवारी खूप वाढली, असे आरोप काँग्रेसने केला होता.
False campaign is being run by some (other than candidates) in furtherance of design to discredit largest elections ever held in the history of mankind in most transparent manner involving candidates/ stakeholders at every stage of elections.
1/3
— Election Commission of India (@ECISVEEP) August 4, 2024
अंदाजे आणि अंतिम मतदानाची तुलना
या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे, मतदानाच्या दिवशीही काही बूथवर लोक रांगेत उभे असतात. कोणत्याही उमेदवाराला गैरप्रकाराचा संशय असल्यास याचिका दाखल करून निवडणुकीला आव्हान दिले जाऊ शकते, मात्र या प्रकरणी कोणतीही याचिका दाखल करण्यात आली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी कमी याचिका दाखल झाल्या.
वोट फॉर डेमोक्रसीबाबत काँग्रेसचे आरोप
निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली मतांची आकडेवारी आणि अंतिम मतदानाची टक्केवारी यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील 4.7 टक्के फरक आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये अंतिम मत 12.5 टक्क्यांनी वाढले. योगायोगाने या दोन्ही राज्यांतील निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या आघाडीने चांगली कामगिरी केली. अशा 79 जागा आहेत जिथे मतदानाची टक्केवारी भाजपच्या किरकोळ विजयाच्या फरकापेक्षा जास्त आहे. म्हणजे 79 जागा भाजपने हेराफेरीने जिंकल्या. पहिल्या टप्प्यात 11 दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यात 6 दिवसांनी आणि उर्वरित टप्प्यात 4-5 दिवसांनी अंतिम आकडे देण्यात आले. मतदान सुरू झाल्यावर दर 2 तासांनी डेटा निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पाठवावा लागतो. साधारणत: 6 वाजेपर्यंत सर्वत्र मतदान होते. यानंतरही काही राज्यांमध्ये 10-12 टक्के मतदान झाले, तर शंका निर्माण होते.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या मते, एकूण मते आणि 362 जागांवर मोजलेली मते यामध्ये 5,54,598 चा फरक आहे. या जागांवर कमी मतांची मोजणी झाली आहे. त्याच वेळी, 176 जागांवर झालेल्या एकूण मतांपेक्षा 35,093 अधिक मतांची मोजणी झाली आहे. अहवालानुसार, अम्रेली, अटिंगल, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमण दीव वगळता एकूण 538 जागांवर पडलेल्या मतांमध्ये आणि मोजण्यात आलेल्या मतांमध्ये तफावत आहे. या 538 जागांवर 5,89,691 मतांचा फरक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community