मुंबईत Drunk and Drive च्या कारवाईत प्रचंड वाढ; हॉटस्पॉट आले समोर

132
मुंबईत Drunk and Drive च्या कारवाईत प्रचंड वाढ; हॉटस्पॉट आले समोर

मद्यपान करून वाहन चालवण्याऱ्या वाहन चालकांवरील कारवाई वेग आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून मागील सात महिन्यांत ४,१९६ ड्रंक अँड ड्राइव्हच्या (Drunk and Drive) कारवाया करण्यात आल्या, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ सात महिन्यांत करण्यात आलेली ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईची आकडेवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान मुंबईत सर्वात जास्त करण्यात आलेल्या कारवाईचे हॉटस्पॉट देखील समोर आले आहे.

मुंबई तसेच इतर राज्यातील इतर महानगरात मद्यपान करून वाहने चालवून अपघात करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून ड्रंक अँड ड्राइव्हच्या (Drunk and Drive) कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक विभागाने १ जानेवारी ते ३१ जुलै २०२४ दरम्यान मुंबई वाहतूक विभागाकडून करण्यात आलेल्या ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईत ४,१९६ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मागील काही वर्षात करण्यात आलेल्या कारवाईपैकी या वर्षी केवळ सात महिन्यांत करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. २०२३ या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत केवळ ४४७ जणांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी कारवाईत मोठी वाढ झाली होती.

(हेही वाचा – हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर Bangladesh च्या PM Sheikh Hasina यांनी सोडला ढाका; हजारो आंदोलक पंतप्रधान निवासात घुसले)

हे आहेत हॉटस्पॉट

तसेच मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांसाठी शहरातील हॉटस्पॉट समोर आले आहे. त्यात पश्चिम उपनगरात सर्वात जास्त हॉटस्पॉट असल्याचे समोर आले आहे. पश्चिम उपनगरातील सहार, साकीनाका, डीएन नगर, सांताक्रूझ, ओशिवरा, मुलुंड, एमआयडीसी (अंधेरी), वाकोला, दहिसर आणि पूर्व उपनगरातील ट्रॉम्बे (मानखुर्द), घाटकोपर यांचा समावेश आहे, दक्षिण मुंबईत नागपाडा हे मद्यपींचे हॉटस्पॉट असल्याचे वाहतूक विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे. या भागात सर्वात अधिक प्रमाणात बियर बार आणि रेस्टॉरंट्स असल्यामुळे दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्याच बरोबर मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण सर्वात कमी असलेल्या भागापैकी मरीन ड्राइव्ह, पायधुनी, कांजूरमार्ग, धारावी, पवई, वडाळा, माहीम, माटुंगा आणि कुलाबा हे विभाग आहेत. या भागात मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण कमी होण्याचे कारण स्पष्ट करताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, या भागात दारूचे सेवन करत नाही असे नाही, तर ते वाहन चालवण्याऐवजी घरी जाण्यासाठी कॅब, टॅक्सी सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. मरीन ड्राइव्ह आणि कुलाबा सारख्या भागात, अनेक वाहनांनी ड्रायव्हर नियुक्त केल्यामुळे या ठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्हच्या (Drunk and Drive) कारवाईचे प्रमाण कमी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.