लोकसभेतील पराभवानंतर Ajit Pawar बारामतीत; कार्यकर्त्यांना म्हणाले, सगळ्यांनी राजीनामा द्यावेत

सोमवारी, अजित पवार (Ajit Pawar)  हे बारामतीच्या दौऱ्यावर असून शरद पवार यांचे होम ग्राऊंड असलेल्या बारामतीतल्या वृंदावन गार्डन येथे कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

232

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची खंत बोलून दाखवताना माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्यावेत, असे विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केले. मागे काय झाले त्या बद्दल माझी काही तक्रार नाही, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. मी 9 तारखेपासून राज्याचा दौरा करतोय, मी राज्याचा दौरा करत असताना माझं घर मला सांभाळावे लागेल. लोकसभेला अनेक बूथवर आपण कमी पडलो. जे झालं त्याला मी जबाबदार आहे, मला संघटनेत बदल करायचे आहेत. त्यामुळे, माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्यावेत, अशा शब्दात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना दम भरला.

सोमवारी, अजित पवार (Ajit Pawar)  हे बारामतीच्या दौऱ्यावर असून शरद पवार यांचे होम ग्राऊंड असलेल्या बारामतीतल्या वृंदावन गार्डन येथे कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. शहर, ग्रामीण, महिला, सगळ्या सेलच्या लोकांनी सगळ्यांनी मला राजीनामे द्यावेत, मी पुढं बघू काय करायचे ते. लोकं म्हणतात त्यात तेल ओतण्याचे काम केलं, आपल्या स्टेजवर बसायचं आणि मागे वेगळं बोलायचं. माझं काटेवाडी प्लसमध्ये गेलं म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे, असेही अजित पवारांनी कार्यकर्ता मेळाव्यात सुनावले.

(हेही वाचा Shaikh Hasina यांच्या राजीनाम्याचा भारतावर परिणाम होणार का? माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित काय म्हणतात?)

मतदान दिले नसेल तरी फॉर्म भरा

लाडकी बहीण चुनावी जुमला म्हणून टीका केली जाते. पण त्याकडे दुर्लक्ष करा. अशाच योजना विविध राज्यात चालू आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कालांतराने वाढवले. सरकारला गरीब जनतेला मदत करायची आहे. पण त्यात लोकांना काही फसवणूक करू नका, कोणतीही योजना आणल्यावर काही त्रुटी राहतात. जिने आपल्याला लोकसभेला मतदान दिले नसले तरी तिला फॉर्म द्या, इथे पक्ष आणू नका, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांनी (Ajit Pawar) भाष्य केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.