Water Supply : जुलैच्या सुरुवातीला निम्म्यावर आलेला जलसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांधिक

5241
Water Supply : जुलैच्या सुरुवातीला निम्म्यावर आलेला जलसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांधिक

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व तलाव आणि धरणांमध्ये १ जुलै २०२४ मागील दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्यांपेक्षा जलसाठा कमी होता. परंतु या जुलै महिन्यांत कमी असलेल्या जलसाठ्याची कसर पावसाने भरुन काढली असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी असणारा पाण्याचा साठा ५ ऑगस्ट २०२४ रोजी जास्त झाला आहे. त्यामुळे या महिन्यांच्या सुरुवातील निम्यावर आलेला यंदाचा पाणीसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक जमा झाला असून यासर्व धरणांमध्ये सध्या ९० टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. तर याच दिवशी मागील वर्षी ८० टक्के आणि त्याआधीच्या म्हणजे सन २०२२ मध्ये ८९.७८ टक्के एवढा जलसाठा जमा झाला आहे. (Water Supply)

तुळशी, तानसा, विहार, मोडक सागर तलाव पाठोपाठा रविवारी मध्य वैतरणा धरणही ओसंडून वाहू लागले आहे. तर मुंबईला ६० टक्क्यांहून अधिक पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणातही ८८.८७ टक्के एवढाच पाणीसाठा जमा झाला आहे. पाच तलाव आणि धरण ओसंडून भरल्याने यासर्व धरणांमधील पाणीसाठा हा ०५ ऑगस्ट २०२४ रोजी १३ लाख ०२ हजार ६१९ दशलक्ष लिटर्स एवढा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता असते, त्यातुलनेत सध्या या सर्व तलाव आणि धरणांमध्ये ९० टक्के म्हणजे १३ लाख ०२ हजार ६१९ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला आहे. (Water Supply)

(हेही वाचा – Coastal Road Project ला विलंब करणाऱ्या कंत्राटदाराला फक्त 35 कोटींचा दंड)

मुंबईला आता प्रतीक्षा आहे अप्पर वैतरणा आणि भातसा धरण भरण्याची. अप्पर वैतरणा धरणांत सध्या ७५.७६ टक्के एवढा जलसाठा असून भातसा धरणांत ८८.३७ जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ही दोन्ही तलाव भरुन दैनंदिन वापराचा साठा लक्षात घेता १ ऑक्टोबर २०१४ पर्यंत एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा जमा होणे आवश्यक आहे. त्यामुळे आज जरी ही सर्व तलाव आणि धरणे ९० टक्के भरली असली तरी प्रत्यक्षात ३१ सप्टेंबर पर्यंत पाणी साठा काय असेल आणि वरूण राज सप्टेंबर शेवटपर्यत ही तलाव ओसंडून वाहू देतात यावरच पुढील पाणी पुरवठ्याची स्थिती ठरवली जाणार आहे. (Water Supply)

०५ ऑगस्ट पर्यंतचा पाणीसाठा

२०२४ : १३ लाख ०२ हजार ६१९ दशलक्ष लिटर्स (९० टक्के)

२०२३ : ११ लाख ५७ हजार ९१९ दशलक्ष लिटर्स (८० टक्के)

२०२२ : १२ लाख ९९ हजार ४२१ दशलक्ष लिटर्स (८९.७८ टक्के)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.