प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, Raj Thackeray यांच्या वर…  

304
प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, Raj Thackeray यांच्या वर...  
प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, Raj Thackeray यांच्या वर...  

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan aaghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टाडा कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे असं खळबळजनक विधान केलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी शासनाचा निधी हा परप्रांतीयांवर खर्च होत असल्याचे विधान केलं होतं. त्यामुळे मनसे विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी लढाई होताना दिसणार आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  (Raj Thackeray)

(हेही वाचा – दोघांचीही नार्को टेस्ट करू; Parambir Singh यांचे अनिल देशमुख यांना आव्हान)

राज ठाकरेंनी काय टीका केली?

महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो, असे वादग्रस्त विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्यावर माध्यमांनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले की, राज ठाकरेंना पहिले अटक झाली पाहिजे. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Coastal Road Project ला विलंब करणाऱ्या कंत्राटदाराला फक्त 35 कोटींचा दंड)

टाडा तर तातडीने लागला पाहिजे

राज ठाकरेंसारख्या व्यक्तीवर टाडा (TADA Court Raj Thackeray) लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न पाहता त्यांना तुरुंगात टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातला माणूस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आहे. गुजरातमध्येही मराठी माणसं आहेत त्यांचं काय करायचं? समाज दुभंगण्याची वक्तव्य हे करत आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट आणि युएपीएच्या कायद्यान्वये कारवाई झाली पाहिजे. टाडा तर तातडीने लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवून त्यांना अटक करावी असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. (Raj Thackeray)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.