Bangladesh ची सद्यस्थिती अमेरिका, चीन आणि पाकिस्तानच्या कट कारस्थानामुळेच; काय म्हणतात Major General G.D. Bakshi

जनरल बक्षी हे १९७१च्या युद्धात सहभागी झाले होते. या युद्धामुळे बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यामुळे जनरल बक्षी यांची मते सद्याच्या स्थितीत महत्वाची ठरतात.

193

बांगलादेशात (Bangladesh) अराजक निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होण्यामागे अमेरिका, चीन आणि पाकिस्तान या तिन्ही देशांचे कटकारस्थान कारणीभूत आहे, भारताच्या शेजारील राष्ट्राला अस्थिर ठेवून पर्यायाने भारताला अस्थिर बनवण्याचा हा या मागील कुटील डाव आहे, असा दावा मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केला. ते ‘हिंदुस्थान पोस्ट’ च्या प्रतिनिधींसोबत बोलत होते.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा सक्रिय सहभाग

जनरल बक्षी हे १९७१च्या युद्धात सहभागी झाले होते. या युद्धामुळे बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यामुळे जनरल बक्षी यांची मते सद्याच्या स्थितीत महत्वाची ठरतात. बांगलादेशात (Bangladesh) जी काही दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा सक्रिय सहभाग ठळकपणे दिसत आहे. येथील हिंसाचार पाकिस्तानाशिवाय शक्यच नाही. कारण पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी याआधीच शेख हसीना बांगलादेशातील एक बेट रिकामे करण्यासाठी दबाव टाकला होता, ज्याला शेख हसीना यांनी नकार दिल्यावर त्यांच्या बाबतीत बरे-वाईट करू, अशी धमकी या संघटनांनी दिली होती. यासाठी हा पुरावा पुरेसा आहे, असे जनरल बक्षी म्हणाले. आता या ठिकाणी तातडीने अंतरिम सरकारची स्थापना होण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी विरोधी पक्ष सत्तेसाठी दावा करणार नाही, कारण त्यांनी निवडणुकीत सहभागच घेतला नव्हता, असेही जनरल बक्षी म्हणाले.

(हेही वाचा Shaikh Hasina यांच्या राजीनाम्याचा भारतावर परिणाम होणार का? माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित काय म्हणतात?)

मागील ४ महिन्यांपासून बांगलादेशात (Bangladesh) विद्यार्थ्यांचे आरक्षणावरून उग्र आंदोलन सुरु आहे. सोमवारी या आंदोलनाने परिसीमा गाठली. परिणामी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्या देश सोडून गेल्या. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही बांगलादेशमध्ये (Bangladesh) हिंसाचार सुरूच आहे. संसदेसोबतच लोकही पीएम हाउसमध्ये घुसून गोंधळ घालत आहेत. भारताच्या शेजारील बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या निषेधार्थ हा हिंसाचार होत आहे. या हिंसाचाराच्या आगीत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.