संभाजी राजेंच्या मूक आंदोलनाला सर्व पक्षीय पाठिंबा! 

122

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी कोल्हापुरात १६ जून रोजी मूक आंदोलनाचे आयोजन केले. या आंदोलनासाठी कोल्हापूर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावे, असे आवाहन देखील कोल्हापूर पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

छत्रपती शाहू महाराज घराण्यातील सदस्यही सहभागी! 

सकाळी 11 वाजता शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात झाली. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी मौन बाळगून तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करुन हे आंदोलन करायचे आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढेल असे कोणतेही कृत्य करायचे नाही, अशा सूचनाही आंदोलकांना देण्यात आलेल्या आहेत. या आंदोलनासाठी शाहू महाराज घराण्यातून स्वतः श्रीमंत शाहू महाराज, मालोजी महाराज, संभाजी राजे यांच्या पत्नी पत्नी संयोजी राजे, पुत्र  शहाजी राजे उपस्थित होते.

(हेही वाचा : आता संभाजी राजेंचा एल्गार, पहिला मोर्चा 16 जूनला)

संभाजी राजेंच्या या आहेत ५ प्रमुख मागण्या!

  • सारथी संस्थेला सक्षम करण्यासाठी पावले उचलणे
  • आण्णासाहेब महामंडळाची स्थापना
  • जिल्ह्यांमध्ये मराठा समाजासाठी वसतीगृह उभारणे
  • ओबीसींप्रमाणे गरीब मराठा समाजाला शैक्षणिक सवलती मिळवून देणे
  • जे २,०८५ विद्यार्थी नोकऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी अडकलेले आहेत त्यांचा मार्ग मोकळा करावा.

फक्त लोकप्रतिनिधी बोलणार!

आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केले. आजचे आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचे ऐकून घ्या, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केले.

(हेही वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान?)

हे लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले! 

  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर
  • काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील
  • आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
  • ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
  • शिवसेना खासदार धैर्यशील माने
  • खासदार संजय मंडलिक
  • जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे
  • आमदार प्रकाश आबिटकर
  • आमदार राजेश पाटील
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.