Mukhyamantri ladki Bahin Yojana : मुंबईत तब्बल तीन दिवसांमध्ये चार लाख अर्जांची छाननी पूर्ण

1119

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhyamantri ladki Bahin Yojana) महिलांकडून अर्ज भरुन घेतले जात असून येत्या १९ ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात याची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साडे पाच लाख अर्ज दाखल झाले होते, त्यातील तब्बल चार लाखांपेक्षा अधिक अर्जांची छाननी तीन दिवसांमध्ये महापालिकेच्या नियोजन विभागाच्या समन्वयाने आणि देखरेखीखाली करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत या सर्व अर्जांच्या छाननीचे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत (Mukhyamantri ladki Bahin Yojana) मुंबई शहरांमध्ये १ लाख ७० हजार प्राप्त आहेत, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये एकूण ३ लाख ८४ हजार अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची छाननी करण्याचे काम गुरुवारपर्यंत महिला व बाल कल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जात होती. परंतु मुंबईमध्ये अत्यंत धिम्या गतीने अर्जांची छाननी होत असल्याने अखेर महापालिका आयुक्तांना निर्देश देत महापालिक नियोजन विभागाच्या देखरेखीखाली याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शुक्रवारपासून महापालिका नियोजन विभागाच्या नियंत्रणाली अर्ज छाननीचे काम हाती घेण्यात आले आणि शहरात दोन आणि उपनगरांमध्ये चार अशाप्रकारे वॉर रुम तयार करून विभाग कार्यालयाच्या पातळीवरही छाननीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाचे समाज विकास अधिकारी व समुदाय संघटक तसेच विभाग कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांची मदत घेऊन महापालिकेने शुक्रवारपासून दिवस रात्र सेवा बजावत सोमवार दुपारपर्यंत तब्बल ४ लाख अर्जांची छाननी पूर्ण केली होती. त्यामुळे उर्वरीत अर्जांची छाननी मंगळवारपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – Mumbai Police Hoax Call : हॉक्स कॉलने वाढवली मुंबई पोलिसांची डोकेदुखी)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे समन्वय असलेल्या महापालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांच्या संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र सेवा बजावत या अर्जांची छाननी केली आहे. सोमवार दुपारपर्यंत चार लाखांपेक्षा अधिक अर्जांची छाननीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत छाननीचे काम मंगळवारपर्यंत होईल. महापालिकेच्या टिमने या अर्जांची छाननी पूर्ण केलेली असल्याने पुढील मान्यता ही जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अर्ज अपलोड करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली असली तरी अर्जांची छाननी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रत्येक विभागांमध्ये संगणक आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Mukhyamantri ladki Bahin Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.