मुंबई – मित्राची हत्या करून मृतदेह सुटकेस मध्ये कोंबून तुतारी एक्सप्रेसने निघालेल्या तरूणाला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी आणि मृत दोघेही मूकबधीर असून एका तरुणीवरून झालेल्या भांडणात दोन जणांनी मिळून पायधुनी येथे एका खोलीत या तरुणाची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक जण मृतदेहाने भरलेली सुटकेस घेऊन तुतारी एक्सप्रेसने निघाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दादर रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण पायधुनी पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून पायधुनी पोलिसांनी दुसऱ्या मारेकऱ्याला नालासोपारा (Nalasopara) येथून अटक केली आहे. मृत आणि दोन्ही आरोपी मूकबधीर आहेत. (Crime)
अर्षद शेख (Arshad Sheikh) असे मृत तरुणाचे नाव आहे, अर्षद हा कुर्ला कलिना येथे राहण्यास होता. जय प्रवीण चावडा आणि शिवजित सुरेंद्र सिंग असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जय चावडा हा पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहे,तर शिवजीत हा नालासोपारा (Nalasopara) येथे राहणारा आहे. रविवारी रात्री दादर टर्मिनस येथून सुटणारी तुतारी एक्सप्रेसमध्ये जय चावडा हा लाल रंगाची सुटकेस घेऊन चढत असताना गस्तीवर असणाऱ्या दादर रेल्वे पोलीस ठाण्यातील एका पोलीस अमलदाराला संशय आल्याने जय याला हटकण्यात आले, व त्याला बॅगेत काय आहे असे विचारले असता, तो मूकबधीर असल्यामुळे काहीही उत्तर देत नव्हता. (Crime)
(हेही वाचा – भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक M. Night Shyamalan)
पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याच्याजवळची सुटकेस आणि जय याला ताब्यात घेऊन बॅग तपासण्यासाठी उघडली असता पोलिसांना धक्काच बसला, सुटकेस मध्ये एका तरुणाचा मृतदेह कोबण्यात आला होता. रेल्वे पोलिसांनी जय चावडा आणि त्याच्याजवळची मृतदेह असलेली सुटकेश ताब्यात घेऊन दादर रेल्वे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले असता जय हा मूकबधिर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, पोलिसांनी मूकबधिरांची सांकेतिक भाषा जाणाऱ्याला बोलावून त्यांच्यामार्फत पोलिसांनी जय ला प्रश्न विचारले असता मृतदेह कुर्ला येथे राहणारा अर्षद शेख याचा असून शिवजीत या मित्राच्या मदतीने जय चावडा याच्या खोलीत अर्षद याची हत्या केल्याची कबुली दिली. दादर रेल्वे पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी गुन्हा पायधुनी पोलिसांकडे सोमवारी सकाळी वर्ग करण्यात आला.
पायधुनी पोलिसांनी या हत्येतील दुसरा मारेकरी शिवजीत सिंग याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली, या दोघांकडे त्यांची सांकेतिक भाषा समजणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने चौकशी करण्यात आली असता अर्षदचे हा ज्या तरुणीवर प्रेम करीत होता, ती जय चावडा याची प्रेयसी होती, यावरून दोघांत वाद देखील झाले होते. रविवारी जय आणि शिवजीत याने अर्षदला पार्टी करण्यासाठी पायधुनी येथे य जय चावडा याच्या घरी बोलावून त्याला भरपूर दारू पाजली त्यानंतर शिवजीत आणि जय यादोघांनी मिळून त्याची हत्या केली, आणि मृतदेह सुटकेस मध्ये कोंबला. त्यानंतर मृतदेह असलेली सुटकेस ची विल्हेवाट लावण्यासाठी जय आणि शिवजीत दादर येथे आले, शिवजीत तेथून नालासोपारा (Nalasopara) येथे निघून गेला आणि जय हा मृतदेह असलेली सुटकेस घेऊन दादर टर्मिनस येथे आला, दादर टर्मिनस येथुन सावंतवाडीला जाणारी तुतारी एक्सप्रेस उभी होती, जय ने चालू तिकीट काढून जनरल डब्ब्याच्या रांगेत उभा असताना रेल्वे पोलिसांनी त्याला संशयावरून ताबीत घेतले अशी माहिती जय ने पायधुनी पोलिसांना दिली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community