Bangladesh Protests : पश्चिम बंगालमधील बांगलादेशच्या सर्व सीमा सील; रेल्वे-विमान सेवा स्थगित

130
Bangladesh Protests : पश्चिम बंगालमधील बांगलादेशच्या सर्व सीमा सील; रेल्वे-विमान सेवा स्थगित
Bangladesh Protests : पश्चिम बंगालमधील बांगलादेशच्या सर्व सीमा सील; रेल्वे-विमान सेवा स्थगित

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा भडका उडाला आहे. देशातील हिंसाचार व जनतेचा वाढता रोष पाहून शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी ५ जुलै रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला आहे. त्या देश सोडून गाझियाबादला आल्या असून तेथून त्या लंडनला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलक थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचल्याने त्यांना देशाचं प्रमुखपद सोडावं लागलं आहे. भारताच्या शेजारील देशात घडत असलेल्या सर्व घटनांचे पडसाद भारतातही दिसून येत आहेत. भारत बांगलादेश सीमेवर अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Sheikh Hasina यांना सत्तेतून पायउतार होण्यामागील आरक्षणाचा मुद्दा आहे तरी काय?)

बांगलादेश सीमा सील

बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्थेची स्थिती पाहता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ, BSF) भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्था तेथील लष्कराच्या हातात गेली आहे. भारत आणि बांगलादेशची सीमा ४,०९६ किलोमीटरपर्यंत पसरली आहे. या संपूर्ण सीमेवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत आणि रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. सिलिगुडी येथे भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे फुलबारी आणि इतर सीमेवर मोठ्या संख्येने ट्रक अडकले आहेत.

भारतातील २०० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द

बांगलादेशमधील नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. रेल्वे गाड्यांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १५ दिवसांपूर्वी कोलकाता-ढाका-कोलकाता मैत्री एक्सप्रेस (Maitree Express) तात्पुरती रद्द केली होती. ही रेल्वेसेवा अजून काही दिवस बंद असेल. त्याचबरोबर बांगलादेश सीमेनजिक धावणाऱ्या मालगाड्या व प्रवासी रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय रेल्वेकडून जवळपास २०० हून अधिक रेल्वे फेऱ्या रद्द केल्याचं सांगितलं जात आहे.

कोलकाता व खुलना या दोन स्थानकांदरम्यान चालवली जाणारी बंधन एक्सप्रेस १५ दिवसांपासून बंद आहे. बांगलादेशमधील राजकीय संकट पाहता पुढील काही दिवस ही रेल्वेसेवा चालू केली जाणार नसल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं आहे. बंधन एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस चालवली जाते.

बांगलादेशकडे जाणारी उड्डाणे रद्द

बांगलादेशमधील अशांततेमुळे इंडिगो (Indigo) आणि एअर इंडियाने (Air India) भारतातून बांगलादेशची राजधानी ढाका येथे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने ढाक्याहून भारतात जाणारे विमान मंगळवारसाठी रद्द केले आहे.

एअर इंडियानेही ढाक्याला जाणारी उड्डाणे तात्काळ रद्द केली आहेत. एअरलाइनने सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बांगलादेशमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आम्ही ढाक्याला येणारी आणि येणारी आमची उड्डाणे तात्काळ रद्द केली आहेत.

आम्ही परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या प्रवाशांना ढाक्यात ये-जा करण्यासाठी कन्फर्म बुकिंगसह मदत करत आहोत आणि रिशेड्यूलिंग आणि कॅन्सलेशन चार्जेसवर एकरकमी सूट देत आहोत. आमच्या ग्राहकांची आणि क्रूची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अधिक माहितीसाठी आमच्या 24/7 संपर्क केंद्रावर 011-6932933/ 011-69329999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.