Bangladesh Protests : पंतप्रधानपदासाठी भारतावर टीका करणारे Mohammad Yunus यांना आंदोलकांचा पाठिंबा

123
Bangladesh Protests : पंतप्रधानपदासाठी भारतावर टीका करणारे Mohammad Yunus यांना आंदोलकांचा पाठिंबा
Bangladesh Protests : पंतप्रधानपदासाठी भारतावर टीका करणारे Mohammad Yunus यांना आंदोलकांचा पाठिंबा

बांगलादेशमध्ये राजकीय भूकंप झाला असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशसाठी भारत हाच सीमा लागून असणारा एकमेव शेजारी देश आहे. त्यामुळे बांगलादेशमधील या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होणार? याचेही अंदाज बांधले जात आहेत. (Bangladesh Protests)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : हॉकीत अमित रोहिदासशिवाय खेळणार भारतीय संघ)

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस (Mohammad Yunus) यांना पाठिंबा आहे. त्यांनीच देशाचं पंतप्रधानपद स्वीकारावं, अशी इच्छा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांनी देशात अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे थेट मोहम्मद युनूस यांना आंदोलकांचाच पाठिंबा असल्यामुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात येत्या काही दिवसांत प्रचंड घडामोडी होण्याची शक्यता आहे.

शेख हसीना यांनी केले होते गुन्हे दाखल

अँटि-डिस्क्रिमिनेशन स्टुडेंट मूव्हमेंट या आंदोलकांच्या मुख्य समन्वय समितीने नव्या सरकार स्थापनेची योजना तयार केली असून त्यात नोबेल पुरस्कार विजेते बांगलादेशी अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांना पंतप्रधानपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकिंग क्षेत्रात केलेल्या कामगिरीची जगभरात चर्चा झाली होती. मात्र, शेख हसीना यांच्या कारकि‍र्दीत मोहम्मद युनूस यांच्यावर काही खटलेही दाखल झाले आहेत.

मोहम्मद युनूस यांची शेख हसीनांवर टीका

मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या कारकि‍र्दीवर टीका करताना “हा देश आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला”, असे विधान केले आहे. “आम्ही शेख हसीना यांच्या कारकि‍र्दीत त्यांच्या अंमलाखालचा देश होतो. त्या एखाद्या अंमलदाराप्रमाणे वागत होत्या. एखाद्या हुकुमशाहप्रमाणे सगळं काही नियंत्रित करत होत्या. आज बांगलादेशचे सर्व नागरिक स्वतंत्र झाले आहेत”, असं युनूस म्हणाले आहेत. युनूस यांनी भारतावरही टीका केली होती.

आंदोलकांचे युनुस यांच्याकडून समर्थन

दरम्यान, सोमवारी काही आंदोलक शेख हसीना यांच्या शासकीय निवासस्थानी घुसून तिथे तोडफोड करताना दिसले. काहींनी वस्तू उचलून नेल्या, तर काहींनी तिथल्या वस्तूंची नासधूस केली. यासंदर्भात विचारणा केली असता मोहम्मद युनूस यांनी आंदोलकांच्या कृत्यांचं समर्थन केलं. “आंदोलकांचा संताप आणि त्यांनी केलेली नासधूस ही त्यांची शेख हसीना यांनी केलेल्या नुकसानीवरची प्रतिक्रिया होती. मला आशा आहे की आता हे तरुण आणि विद्यार्थी बांगलादेशाला उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं घेऊन जातील”, असं मोहम्मद युनूस यांनी नमूद केलं. (Bangladesh Protests)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.