Prakash Solanke : राष्ट्रवादीत मोठी घडामोड; काकांची निवृत्ती, पुतण्याला केलं वारसदार घोषित

368
Prakash Solanke : राष्ट्रवादीत मोठी घडामोड; काकांची निवृत्ती, पुतण्याला केलं वारसदार घोषित
Prakash Solanke : राष्ट्रवादीत मोठी घडामोड; काकांची निवृत्ती, पुतण्याला केलं वारसदार घोषित

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि नेते तयारीला लागले आहेत. नेत्यांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. त्याचाच भाग म्हणजे माजलगावचे अजित पवार गटातील विद्यमान आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) हे २०२४ च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावांचे दौरे करत आहेत. यादरम्यान, एका गावात बोलताना त्यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. वयोमानानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच, आपल्या ऐवजी पुतणे जयसिंह सोळंके हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.

शरद पवारांनाही दिला सल्ला

या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. राजकारणात मोठ्याने कुठे थांबायचं हे ठरवायला पाहिजे, शरद पवारांनी सुद्धा वेळीच थांबायला पाहिजे होतं, असे आमदार सोळंके (Prakash Solanke) यांनी म्हटलं. आता, आमदार सोळंके यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पलटवार होण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवारांची ओळख आजही ८३ वर्षांचा तरुण म्हणून राष्ट्रवादीकडून करुन दिली जाते. तर, स्वत: शरद पवार (Sharad Pawar) हेही मी काय म्हातारा झालोय का, असे म्हणत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

(हेही वाचा – Pune Heavy Rain : पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुणे महापालिकेच्या वतीने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू)

चुलता पुतण्याच्या राजकारणाची परंपरा

राज्यामध्ये चुलत्या पुतण्याच्या राजकारणामध्ये अनेक कुटुंब विभक्त झाल्याचे उदाहरण समोर असतानाच मागच्या चार ते पाच दशकापासून सक्रीय राजकारणात असलेल्या सोळंके कुटुंबाने मात्र वेगळा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके (Prakash Solanke) यांनी राजकीय निवृत्ती घेताना चक्क त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके हेच आगामी राजकीय वारसदार असतील अशी घोषणा देखील केली. या घोषणेनंतर प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीचं कारण देत शरद पवारांनाच टोला लगावल्याचं दिसून आलं.

जयसिंह सोळंके कोण आहेत ?

जयसिंह सोळंके हे प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांचे कनिष्ठ बंधू धैर्यशील सोळंके यांचा मुलगा आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता हेच जयसिंह सोळंके प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याला पाहायला मिळू शकतात. मात्र अजित पवार गट जयसिंह सोळंके यांच्या नावाला मान्यता देतो का ते आता पाहायला हवं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.