शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualification Case) सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (६ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरविलं नाही. त्या निर्णयाला आव्हान देत शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. (MLA Disqualification Case)
(हेही वाचा – Bangladesh Protests : Sheikh Hasina बांगलादेश सोडून भारतात आल्यावर Kangana Ranaut काय म्हणाल्या?)
शिवसेनेची सर्व कागपदपत्रे पूर्ण असून राष्ट्रवादीची कागदपत्रे दाखल करण्यासाठी वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त वेळ देण्यात येत असून सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी सरन्यायाधीशांनी राष्ट्रवादीच्या वकिलांना तुम्ही आम्हाला आदेश देऊ नका, असं म्हणत चांगलंच खडसावलं आहे. (MLA Disqualification Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community