Nanded News: १२वी च्या विद्यार्थ्यांची ‘ती’ सेल्फी ठरली शेवटची; ४ मित्र बुडाले, १ थोडक्यात बचावला

212
Nanded News: १२वी च्या विद्यार्थ्यांची 'ती' सेल्फी ठरली शेवटची; ४ मित्र बुडाले, १ थोडक्यात बचावला
Nanded News: १२वी च्या विद्यार्थ्यांची 'ती' सेल्फी ठरली शेवटची; ४ मित्र बुडाले, १ थोडक्यात बचावला

पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पाच मित्र फिरायला म्हणून झरी या ठिकाणी आले होते. त्यावेळी, फोटो काढण्यासाठी पाचजण खदानीत खाली उतरले. फोटो काढल्यानंतर पाच पैकी 4 जण पाण्यात उतरुन पाण्यात पोहोण्याचा, अंघोळ करण्याचा आनंद घेत होते. मात्र, खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही मित्र खदानीत बुडाले. त्यांनंतर, त्यांच्यातील एका बचावलेल्या मित्राने ही माहिती नातेवाईकाना कळवली. (Nanded News)

(हेही वाचा –Zika news: पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या ६६ वरती)

नातेवाईक व परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलास व पोलीस यंत्रणांनीही घटनास्थळी धाव घेत खदानीत बुडालेल्या 4 मुलांचा शोध सुरू केला होता. अग्निशमन दल आणि गोदावरी जीव रक्षक दलाच्या जवानानी दोन तास शोध घेऊन चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी खदानीजवळच टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनं नांदेड जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Nanded News)

(हेही वाचा –Prakash Solanke : राष्ट्रवादीत मोठी घडामोड; काकांची निवृत्ती, पुतण्याला केलं वारसदार घोषित)

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चारही तरुण 12 वीचे विद्यार्थी होते. हे सर्वच मित्र शहरातील देगलुर नाका भागातील रहिवासी होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहिम सुरू केली होती. (Nanded News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.