Britain News: ब्रिटनमध्ये तणावाची स्थिती, नागरिकांसाठी प्रवासी सूचना जारी!

338
Britain News: ब्रिटनमध्ये तणावाची स्थिती, नागरिकांसाठी प्रवासी सूचना जारी!
Britain News: ब्रिटनमध्ये तणावाची स्थिती, नागरिकांसाठी प्रवासी सूचना जारी!

बांगलादेशपाठोपाठ ब्रिटनमध्येदेखील (Britain News) तणावाची स्थिती निर्माण होत आहे. देशाच्या अनेक भागांमधून हिंसक घटना समोर येत आहेत. साऊथपोर्टमध्ये एका डान्स क्लासमध्ये झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. साऊथपोर्टमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

नेमकं काय घडतंय?
अलीकडेच लिवरपूल, हल, ब्रिस्टल, लीड्स, ब्लॅकपूल, स्टोक-ऑन-ट्रेंट, बेलफास्ट, नॉटिंघम व मॅन्चेस्टरमध्ये दगडफेकीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाक्यांद्वारे स्फोट घडवण्यात आले. कित्येक दुकानांवर हल्ले झाले आहेत. अनेक दुकानं व वाहनांना आग लागवण्याचे प्रकार समोर येत आहेत. जमाव व पोलिसांमध्ये अनेक चकमकी घडल्या आहेत. यात काही पोलिस व नागरिक जखमी झाले आहेत. (Britain News)

दरम्यान, भारत सरकार (Indian Government) या घटनांकडे गांभीर्याने पाहत असून त्यांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. तसेच भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Britain News)

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी प्रवासी सूचना जारी करताना म्हटलं आहे की, भारतीय प्रवाशांना युनायटेड किंगडममधील काही भागात घडत असलेल्या हिंसक घटनांची माहिती असेल. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु, येथील सद्यस्थिती पाहता भारतातून यूकेला येणाऱ्या प्रवाशांना आम्ही सल्ला देत आहोत की, त्यांनी यूकेला येताना, इथे राहत असताना सतर्क राहावं आणि सावधानता बाळगावी. स्थानिक वृत्त व स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. ज्या-ज्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत, हिंसाचार चालू आहे तिथे जाऊ नये. (Britain News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.