भारतात हरितक्रांती घडवून आणणारे M. S. Swaminathan

135
भारतात हरितक्रांती घडवून आणणारे M. S. Swaminathan

मणकोंबू संबासिवन स्वामीनाथन म्हणजेच एम. एस. स्वामीनाथन (M. S. Swaminathan) हे भारतीय कृषी शास्त्रज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ होते. स्वामीनाथन हे हरितक्रांतीचे जागतिक नेते होते. गहू आणि तांदूळ या उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींचा परिचय आणि विकास करण्यात मोठे योगदान दिले होते. कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या नेतृत्वासाठी आणि भूमिकेसाठी त्यांना भारतातील हरितक्रांतीचे मुख्य शिल्पकार म्हटले जाते.

स्वामीनाथन (M. S. Swaminathan) यांचा जन्म कुंभकोणम, मद्रास प्रेसिडेन्सी येथे ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. ते जनरल सर्जन एम. के. संबासिवन आणि पार्वती थंगम्मल संबासिवन यांचे सुपुत्र होते. त्यांच्या वयाच्या अकराच्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या काकांनी केले.

(हेही वाचा – Britain News: ब्रिटनमध्ये तणावाची स्थिती, नागरिकांसाठी प्रवासी सूचना जारी!)

स्वामीनाथन (M. S. Swaminathan) यांनी भारतात हरितक्रांती घडवून आणली. तत्पुर्वी त्यांनी मद्रास कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली. पुढे इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इंस्टिट्यूटमधून पदव्यूत्तर शिक्षणही घेतले. नंतर त्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली. मात्र त्यांनी कृषी क्षेत्राचीच निवड केली. स्वामिनाथन यांच्या नॉर्मन बोरलॉग यांच्यासोबत मिळूण शेतकरी आणि इतर शास्त्रज्ञांसह जनआंदोलनाचे नेतृत्व केले आणि अथक प्रयत्नाने १९६० च्या दशकात भारत आणि पाकिस्तानला काही विशिष्ट दुष्काळाच्या परिस्थितीपासून बाहेर काढले.

त्यांनी कृषीसंशोधन तर केलेच त्याचबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन यात देखील योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार, अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. (M. S. Swaminathan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.