विधानसभेच्या आगामी निवडणुकीत नेतृत्व कोणी करायचे यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय निरूपम यांनी मंगळवारी (६ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टिकास्त्र सोडले.
ठाकरे मंगळवारपासून तीन दिवसांकरिता दिल्ली दौऱ्यावर आहेत. पुणे, नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पूरग्रस्तांसाठी मदतकार्य आणि उपाययोजनांना प्राधान्य दिले. दिल्ली दौरा त्यांनी यावेळी रद्द केला. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या दारात खेटे झिजवत आहेत, अशी टीका केली. महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीसाठी नेतृत्व कोणी करायचे? यावरून मतभेद आणि रस्सीखेच सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत फेक नेरिटिव्ह तयार करून त्यांनीले यश मिळवले. आता विधानसभेत असे होणार नाही. परंतु, त्यापूर्वीच भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सुप्रिया सुळेंची नावे आघाडीवर आहेत. काहींनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. परंतु त्यांची ती इच्छा पूर्ण होणार नाही, असे निरूपम (Sanjay Nirupam) म्हणाले.
(हेही वाचा – Sanjay Raut-Prakash Ambedkar : शिवसेना उबाठाचा प्रकाश आंबेडकरांना टोला; आंबेडकरांनी ‘दुखरी नस दाबली’)
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत जवळपास दीड कोटींच्यावर ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहे. एक कोटीच्यावर ऑफलाईन अर्ज दाखल झाले आहेत. आणि केवळ सात हजार अर्ज अपुऱ्या कागदपत्रा अभावी बाद झाले आहेत, अशी माहिती निरुपम (Sanjay Nirupam) यांनी दिली. १७ ऑगस्टपर्यंत अर्जाची छाननी पूर्ण होऊन रक्षाबंधनाच्यापूर्वीच महिलांच्या बॅंक खात्यात दीड हजार रुपयांची भाऊबीज मिळतील, असे निरूपम यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community