Sindhu River: चीनला चोख प्रत्युत्तर! भारतीय लष्कराने सिंधू नदीवर बांधला नवीन पूल

322
Sindhu River: चीनला चोख प्रत्युत्तर! भारतीय लष्कराने सिंधू नदीवर बांधला नवीन पूल
Sindhu River: चीनला चोख प्रत्युत्तर! भारतीय लष्कराने सिंधू नदीवर बांधला नवीन पूल

‘एलओसी’वर चीनच्या कुरापतीनंतर आता भारतानेही या भागात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय लष्करामधील स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या न्योमा सॅपर्सने पूर्व लडाखमधील पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर (Sindhu River) एक भक्कम ह्युम पाइप पुलाचे बांधकाम केले आहे. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. तसेच लष्कर आणि सामान्य नागरिकांना न्योमा आणि निडर या गावांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे.

(हेही वाचा –Vishalgad: विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव)

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने मंगळवारी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबतची माहिती दिली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पूर्व लडाखमधील न्योमा आणि निडर परिसरातील गावांदरम्यान नागरिक आणि लष्कराची ये जा सोपी व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाची पूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. एकूण 1 मिनिट 7 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पूल बनवण्याच्या पूर्ण प्रकियेबरोबर लष्कराची काही अवजड वाहने देखील या पुलावरून जाताना दिसत आहेत. (Sindhu River)

(हेही वाचा –Britain News: ब्रिटनमध्ये तणावाची स्थिती, नागरिकांसाठी प्रवासी सूचना जारी!)

या माध्यमातून हा पुल किती भक्कम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न लष्कराने केला आहे. हे पूल बांधण्यासाठी लष्कराच्या इंजिनियर्सनी ह्यूम पाइपचा वापर केला आहे. त्यानंतर त्यावर मजबूत बांधकाम केलं आहे. तसेच या पुलाचे काम कमीत कमी वेळात झाल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वी 30 जुलै रोजी लडाखमधील भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने 400 मीटर लांब पुलाचे बांधकाम केल्याची माहिती पुढे आली होती. मात्र हा पुल चीनने 1958 मध्ये बळकावलेल्या भागात बांधण्यात आला होता. (Sindhu River)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.