PM Swanidhi चा लाभ घेणाऱ्या फेरीवाल्यांना केंद्राच्या योजनांची लॉटरी, मिळणार आठ योजनांचा लाभ

1426
PM Swanidhiचा लाभ घेणाऱ्या फेरीवाल्यांना केंद्राच्या योजनांची लॉटरी, मिळणार आठ योजनांचा लाभ
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाई दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून आता फेरीवाल्यांना प्रत्यक्षात व्यवसाय करता येईल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र, महापालिकेच्यावतीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे पाऊल उचलण्यात आले असले तरी यात किती फेरीवाले पात्र होतील तर्क वितर्क लढवले जात असले तरी या फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. ज्या फेरीवाल्यांनी पंतप्रधान स्व:निधीचा (PM Swanidhi) लाभ घेता आहे, त्या फेरीवाल्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या आठ योजनांचा लाभ मात्र मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईतील पथ विक्रेत्यांसाठी पंतप्रधान स्व निधीच्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतंर्गत मुंबईतील फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. मुंबईत पंतप्रधान स्व:निधी योजनेसाठी फेरीवाल्यांकडून तब्बल १ लाख ६० हजार अर्ज प्राप्त झाले आहे. त्यातील १ लाख २४ हजार अर्जदारांचे कर्ज मान्य करण्यात आले. त्यामुळे तब्बल सव्वा लाख फेरीवाल्यांनी पंतप्रधान स्व:निधीचा (PM Svanidhi) लाभ घेतला. मुंबई महापालिकेला या योजनेतंर्गत दोन लाख फेरीवाल्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य होते, परंतु प्रत्यक्षात सव्वा लाख फेरीवाल्यांना बँकेचे अर्थसहाय्य लाभले.

(हेही वाचा – ओरिसामध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती नको; PM Narendra Modi यांचा भाजपाच्या खासदारांना सल्ला)

मुंबईत अद्यापही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेले नसून या धोरणाच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षात पात्र फेरीवाले किती असतील याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता नसून भलेही फेरीवाले पात्र ठरले नाही तरी केंद्राच्या योजनेसाठी ते पात्र ठरले जाणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून स्व:निधी से समृद्धी असे अभियान राबवले जात असून या अभियानांतर्गत आठ योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनांचा लाभ पंतप्रधान स्व:निधीचा लाभ घेणाऱ्या फेरीवाल्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना, पंतप्रधान जन धन योजना, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, जननी सुरक्षा योजना, बीओ सी डब्ल्य अंतर्गत नोंदणी आणि पंतप्रधान मातृ वंदन योजना आदी योजना राबवल्या जात असून या सर्व योजनांचा लाभ स्व:निधी से समृद्धी अंतर्गत फेरीवाल्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे फेरीवाला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सर्व प्रकारची कागदपत्रे सादर केल्यानंतर या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. (PM Swanidhi)

महापालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या फेरीवाल्यांनी पंतप्रधान स्व निधीचा लाभ घेतला आहे, त्या फेरीवाल्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना स्व:निधी से समृद्धी अंतर्गत येणाऱ्या आठ योजनांचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत फेरीवाल्यांकडून त्यांच्या कुटुंबीयांची कागदपत्रे जमा करून त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी फेरीवाल्यांनी आपल्या कुटुंबांतील सदस्यांची माहिती व संबंधित कागदपत्रे प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयातील नियोजन विभाग अंतर्गत समाज विकास अधिकारी तथा समुदाय संघटक यांच्याकडे सादर केल्यास केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल, असे जांभेकर यांनी स्पष्ट केले. (PM Swanidhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.