दिवंगत भाजपा नेत्या, देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि खासदार बन्सुरी स्वराज यांच्या वतीने 6 ऑगस्ट रोजी ‘एक झाड, आईच्या नावे’ या महिमेच्या अंतर्गत वीर सावरकर पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
(हेही वाचा बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CM Eknath Shinde यांच्याकडून उपाययोजना)
या मोहिमेअंतर्गत दिवंगत सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या स्मरणार्थ २१ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विनय रावत, जिल्हाध्यक्ष सुनील कक्कर, राजीव राणा, माजी प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, मीडिया प्रमुख प्रवीण शंकर कपूर, भाजप नेते राधेश्याम शर्मा, श्याम शर्मा, वीरेंद्र बब्बर, विशाखा शैलानी, सुनील यादव, गिरीश सचदेवा, डॉ. शिखा राय, उमंग बजाज, कुसुम लता आदी उपस्थित होते. सुषमा स्वराज या आपल्या सर्वांसाठी आईसारख्या होत्या, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर “एक झाड, आईच्या नावेर” या मोहिमेअंतर्गत आज मी आणि आमचे खासदार बन्सुरी स्वराज यांनी मिळून त्यांच्या स्मरणार्थ येथे २१ झाडे लावली आहेत, असे गिरीश सचदेवा म्हणाले. सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व आजही आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहे. विरोधाला न जुमानता सभागृहात आपले विचार सभ्यपणे कसे मांडायचे हे आपण त्यांच्याकडून शिकलो आहोत, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community