राज्यात अंमली पदार्थ विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. एएनसी, गुन्हे विभाग, रेल्वे पोलीस निरिक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. गृह विभागाने या संदर्भातील मंगळवारी (६ ऑगस्ट) जारी केला. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ (Drugs) विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना यात दिल्या आहेत.
राज्यासमोर अंमली पदार्थांचे (Drugs) मोठे आव्हान उभे राहिले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आहे. कुरिअर, इन्स्टाग्राम, फेसबुक चॅट किंवा अन्य मॅसेंजरच्या माध्यमातून होणारी विक्री राज्यासमोर मोठे आव्हान बनले आहे. देशासह राज्यात अंमली पदार्थ विक्रीच्या काळा बाजाराला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना ‘संयुक्त कृती आराखडा’ सादर केला. तसेच अंमली पदार्थांचा (Drugs) समूळ नायनाट होईल, या स्वरूपाचे धोरण राबविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यात गृह विभागाच्या माध्यमातून अंमली पदार्थविरोधी पथक स्थापन केले होते. पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस महासंचालक, पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या नियंत्रणाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे टास्क फोर्स स्थापन केले आहे. आता वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Bangladesh Protests: ब्रिटनमध्ये रचला शेख हसीना यांच्या विरोधातील कट; हिंसाचारामागे पाकिस्तान, चीन?)
कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी
मुंबई पोलीस उपायुक्त अंमली पदार्थ विरोधी सेल (ANC), राज्यातील इतर सर्व आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) आणि उपायुक्त, रेल्वे पोलीस निरीक्षक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यस्तरीय अंमली पदार्थांची (Drugs) माहिती गोळा करून संबंधित अहवाल नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community