Paris Olympic 2024 : मीराबाई चानू ऑलिम्पिक पदक राखणार का? भारताचं संपूर्ण वेळापत्रक

Paris Olympic 2024 : मीराबाई चानू आणि विनेश फोगाट यांच्यावर भारतीयांचं लक्ष असेल 

140
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश करून भारतीय पथकात अचानक जान फुंकली आहे. थोडक्यात हुकलेल्या काही पदकांनंतर अचानक भारतीय पथकात विनेशच्या विजयामुळे उभारी आली असेल. आता बुधवारी विनेश सुवर्ण पदकासाठी खेळेल. त्याचवेळी टोकयोमधील रौप्यविजेती मीराबाई चानू (Saikhom Mirabai Chanu) आपलं पदक राखण्यासाठी भारोत्तोलन स्पर्धेत उतरेल. दुसरीकडे टोकयो ऑलिम्पिकमध्ये चौथी आलेली अदिती अशोकही गोल्फमध्ये आपलं कसब आजमावेल. (Paris Olympic 2024 )

(हेही वाचा- CM Eknath Shinde यांचा महत्त्वाचा निर्णय; राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार)

भारतीय संघाचं बुधवारचं वेळापत्रक पाहूया,

  • ॲथलेटिक्स 

११.०० – सूरज पनवर व प्रियंका गोस्वामी, मिश्र सांघिक रेसवॉक रिले (प्राथमिक फेरी)

१.३५ – सर्वेश कुसारे, पुरुषांची उंच उडी पात्रता फेरी ब गट

१.४५ – ज्योती याराजी, महिलांची १०० मी अडथळ्यांची शर्यत, पहिली फेरी

१.५५ – अन्नू राणी, महिलींची भालाफेक प्राथमिक फेरी

१०.४५ – रात्री प्रवीण चित्रवेल, अब्दुल नारंगोलिनतेविदा, पुरुषांची तिहेरी उडी

१.१३ – रात्री अविनाश साबळे, पुरुषांची स्टीपलचेज अंतिम फेरी

  • गोल्फ 

१२.३० – अदिती अशोक, दिक्षा डागर महिलांची वैयक्तिक स्ट्रोक प्ले

(हेही वाचा- भारतात हरितक्रांती घडवून आणणारे M. S. Swaminathan)

  • टेबलटेनिस 

१.३० – भारत वि. जर्मनी सांघिक स्पर्धा उपउपांत्य फेरी

  • कुस्ती 

२.३० – अंतिम पनघल वि. झेनेप येदगिल महिलांची ५३ किलो गट अंतिम १६ जणांची फेरी

४.२० – अंतिम पनघल ५३ किलो वजनी गट अंतिम ८ जणांची फेरी (पात्र ठरल्यास)

१०.२५ – अंतिम पनघल ५३ किलो वजनी गट उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास)

१२.३० – मध्यरात्री विनेश फोगाटची सुवर्ण पदकाची फेरी

(हेही वाचा- PM Svanidhi चा लाभ घेणाऱ्या फेरीवाल्यांना केंद्राच्या योजनांची लॉटरी, मिळणार आठ योजनांचा लाभ)

  • भारोत्तोलन 

११.०० – मीराबाई चानू, ४९ किलो वजनी गट प्राथमिक व अंतिम फेरी

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.