Paris Olympic 2024 : हॉकीत सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं, शेवटच्या क्षणी गोल करून जर्मनी अंतिम फेरीत 

Paris Olympic 2024 : उपांत्य फेरीत भारताचा जर्मनीकडून २-३ ने पराभव 

102
Paris Olympic 2024 : जर्मनीविरुद्ध शेवटच्या ८ सेकंदातही भारताने गोलचा जोरदार प्रयत्न केला….
Paris Olympic 2024 : जर्मनीविरुद्ध शेवटच्या ८ सेकंदातही भारताने गोलचा जोरदार प्रयत्न केला….
  • ऋजुता लुकतुके

काही पराभव जिव्हारी लागतात. यंदा ऑलिम्पिकमध्ये असे थोडेथोडके नाही तर पाच पराभव भारतीयांच्या वाट्याला आले आहेत, जिथे शेवटच्या क्षणी अंदाज चुकून भारताचं पदकच हुकलं आहे. २४ तासांपूर्वी ती वेळ बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनवर (Lakshya Sen) आली होती. आघाडी मिळवूनही दोन सामने तो हरला. कांस्य पदकही हातचं गेलं. आता हॉकी संघाने जर्मनीविरुद्ध कसून प्रयत्न केला. मैदानावर चेंडूचा ताबा राखण्यात यश मिळवलं. पण, शेवटी २-३ असा पराभव भारतीय संघाला पत्करावा लागला. अमित रोहिदासची (Amit Rohidas) गैरहजेरी आणि बचावातील काही क्षणांच्या त्रुटी भारतीय संघाला भोवल्या. आता भारतीय संघाचा मुकाबला कांस्य पदकासाठी स्पेनशी होणार आहे. (Paris Olympic 2024)

भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय संघाला जर्मनीनं 3-2 गोलनं पराभूत केलं. जर्मनीनं दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला. यामुळं भारताला 3-2 अशा गोलनं पराभव स्वीकारावा लागला. भारतानं सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. मात्र, जर्मनीनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये पलटवार करत 2 गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-1 नं पिछाडीवर होता. भारताचा डिफेंडर अमित रोहिदास (Amit Rohidas) वर रेड कार्ड असल्यानं एका मॅचसाठी बंदी घातली गेली होती. याचा देखील भारताला फटका बसला. भारताला या ऑलिम्पिकमध्ये अजूनही पदक मिळू शकतं. भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Sindhu River: चीनला चोख प्रत्युत्तर! भारतीय लष्कराने सिंधू नदीवर बांधला नवीन पूल)

भारतानं उपांत्य फेरीत पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला होता. भारतानं पहिला गोल करत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं दोन गोल केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं कमबॅक करत एक गोल केला आणि बरोबरी साधली. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं कमबॅक केलं आणि एक गोल केला. त्यामुळं भारताचा ३-२ असा पराभव झाला.  भारतानं अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जंग जंग पछाडलं. मात्र, जर्मनीच्या बचाव फळीच्या तगड्या कामगिरीमुळं ते शक्य झालं नाही. अखेरच्या काही मिनिटात श्रीजेशला बाहेर बसवून भारतानं एक खेळाडू वाढवला. मात्र, नेमका त्यावेळी जर्मनीनं पेनल्टी कॉर्नर मिळवला. भारताच्या बचाव फळीनं गोल वाचवला. शेवटच्या दीड मिनिटात भारतानं दोनवेळा जर्मनीविरुद्ध गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र यश आलं नाही. (Paris Olympic 2024)

भारतीय संघानं अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली मात्र गोल करण्यात यश आलं नाही. जर्मनीच्या तुलनेत भारताला पेनल्टी कॉर्नर अधिक मिळाले होते. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आलं. भारताला अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी असून भारत आणि स्पेन यांच्यात कांस्य पदकासाठी लढत होईल. भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची मॅच ८ ऑगस्टला सायंकाळी  साडेपाच वाजता होईल.  (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : मीराबाई चानू ऑलिम्पिक पदक राखणार का? भारताचं संपूर्ण वेळापत्रक)

भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशची (PR Sreejesh) करिअरमधील अखेरचा मुकाबला ८ ऑगस्टला होणार आहे. भारत त्या सामन्यात विजय मिळवून पीआर श्रीजेशला अनोखं फेअरवेल देण्याचा प्रयत्न करेल. भारताचा बचाव फळीचा खेळाडू अमित रोहिदास देखील संघात परतल्याचा फायदा होईल.  (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.